akshardhara
Lady Doctors ( लेडी डॉक्टर्स )
Lady Doctors ( लेडी डॉक्टर्स )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आज भारतीय स्त्रिया फार मोठ्या प्रमाणात वैद्यकीय क्षेत्रात करीअर करत आहेत. ह्यात जगावेगळ वाटत नाही, पण आद्य महिला डॉक्टरांनी कशा परिस्थितीत वैद्यकीय शिक्षण घेतल असेल ह्याची कल्पनाही करता येत नाही. कुटुंब, जात आणि समाजाच्या बेड्यांनी त्यांना शतकानुशतकांपासून करकचून बांधून ठेवल होत. ही बंधन तोडण्यासाठी त्यांना किती प्रयास आणि खडतर संघर्ष करावे लागले ही कथा सांगायलाच हवी होती. लेडी डॉक्टर्स मध्ये लेखिकेन १८६० ते १९३० ह्या कालावधीतील सहा स्त्रियांचा अदभुत, असामान्य जीवनप्रवास उलगडला आहे. स्त्रीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्याची बौध्दिक क्षमताच नाही ह्या गृहीतकाला आव्हान देणार्या सहाजणी जातीचा नियम तोडून समुद्रापार गेलेली आनंदीबाई जोशीपासून ते बालपणी झालेला विवाह नाकारून, नवर्याला घटस्फोट देण्याच धाडस दाखवणार्या आणि जिद्दीन डॉक्टर झालेल्या रखमाबाई राऊतपर्यंत. करीअर आणि आठ मुल लीलया सांभाळणार्या कदंबिनी गांगुलीपासून ते कमालीच दारिद्रय आणि कष्ट ह्यातून जिद्दीन मार्ग काढणार्या बालविधवा हेमावती सेनपर्यंत ह्या महिला आपल्या मनावर खोलवर ठसा सोडतात. आजच्या आधुनिक स्त्रियांना काळाच्या पडद्याआड गेलेल्या ह्या अलौकिक झुंजार स्त्रियांकडून प्रेरणा घेण्यासारख बरच काही आहे.
ISBN No. | :9789391629526 |
Author | :Kavita Rao |
Publisher | :Madhushree Publication |
Translator | :Ulka Raut |
Binding | :paperbag |
Pages | :240 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

