akshardhara
Click Trick ( क्लिक ट्रिक )
Click Trick ( क्लिक ट्रिक )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
छायाप्रकाशाचा खेळ म्हणजे प्रकाश रंगातून रंगलेली स्मरणचित्रे अस म्हणत फोटोंच आठवणींशी निगडित असलेल नात सांगत, नमनालाच सावलीच्या छटा फार छान मांडल्या आहेत.
फोटो कुठे कुठे असतो, हे मांडत, फोटोग्राफर चित्रकलेतून कल्पनेला आकार देतो अस सांगत रस्त्यावरून फिरणार्या वाहनांकडे नीट निरखून बघा, विविध मानवी चेहरे भाव दिसतात म्हणत, पुढे त्यांनी गमतीशीर टीप्पणी केली आहे. ती अशी एस. टी. हिरमुसलेली, रिक्षा नाक उडवणारी, अॅम्बेसिडर मोकळेपणाने हसणारी काय नेमक भाष्य फोटोग्राफिक नजरेच !
फोटो काढण्यापूर्वी गरज शोधक नजरेची अस सांगत प्रवेशव्दाराच्या कमानीतून दिसणार्या ताजमहालच उदाहरण देत तो फोटो बघायची उत्सुकता वाढवली आहे. उसळत्या समुद्राला क्षितिजाची पार्श्वभूमी फोटोत नसेल, तर भकास वाटेल ही टिप्पणी विविध कोनांतून, आकारातून, triangle कम्पोझीशन दिसणे, हा त्या फोटोग्राफरच्या कल्पनाशक्तीचा अविष्कार असतो. चित्रकारांनी काढलेल्या चित्राचे अवलोकन करणे, हे उत्तम फोटोग्राफी करण्यासाठी मार्गदर्शक ठरते. फोटो काढण्यापूर्वी, फोटो का काढत आहोत, कशाचा काढत आहोत, याचा विचार हवाच. फोटोग्राफीचा छंद हृदयातून जन्माला आला, विचारातून साकारला गेला, तर येणारा प्रत्येक फोटो मनाची सतार झंकारत जाईल, असे अप्रतिम मुद्दे अर्चनाने मांडलेत. फोटोंना कविता सुचणे, फोटोंच्या वेगवेगळ्या वेळा असे छायाचित्र कलेशी संबंधित अनेक रंग पुस्तकात मांडले आहेत. असे हे फोटो बोलक पुस्तक फोटोत रस असलेल्याम्नी मनात फोटो काडून ठेवावा अस हे अर्चनाच क्लिक ट्रिक.
ISBN No. | :9789391948702 |
Author | :Archana Deshpande - Joshi |
Publisher | :Diamond Publications |
Binding | :paperbag |
Pages | :126 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

