Swapnapurti ( स्वप्नपूर्ती )
Swapnapurti ( स्वप्नपूर्ती )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
वाडवडलांकडून चालत आलेला कोणताही उद्योग किंवा व्यवसाय नसताना, केवळ स्वत:च्या हिमतीवर, स्वकर्तृत्वाने ज्यांनी आपला व्यवसाय सुरू केला, असे हे पहिल्या पिढीतले एकवीस नवउद्योजक! त्यांच्या अंत:प्रेरणा काय होत्या, हे जाणून घेण्यासाठी म्हणून त्यांना बोलत कराव, त्यांना लिहित कराव आणि त्यातून नवउद्योगाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने हे संकलन केल आहे. त्यांच्या स्वप्नांची पूर्तता झाली, म्हणून ही स्वप्नपूर्ती !
प्रस्तुत पुस्तकात या उद्योजकांपैकी काहींनी स्वत: लेखन केल आहे, तर काहींच्या कहाणीच दुसर्याने शब्दांकन केल आहे. नवउद्योगाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या ज्या तरूण तरूणींना स्वकर्तृत्वावर काही करण्याची इच्छा आहे; ज्यांना नोकरी न करता नोकर्या निर्माण करायच्या आहेत, त्यांना या छोटेखानी पुस्तकातून प्रेरणा मिळेल, या विश्वासाने एकवीस वेगवेगळ्या उद्योगांच्या आणि व्यवसायांच्या संदर्भातल हे संकलन आपल्या हातात देत आहोत. ते तरूण तरूणींना उपयोगी पडेल आणि संपादकांचीही स्वप्नपूर्ती होईल, यात शंका नाही. या पुस्तकाव्दारे आपल्याला नव्या उद्यमशील वाटा सापडतील.
ISBN No. | :9789391948726 |
Author | :Subhash Bhave |
Publisher | :Diamond Publications |
Binding | :paperbag |
Pages | :84 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |