Barik Barik Awaj Vadhat Chalalet ( बारीक बारीक आवाज वाढत चाललेत )
Barik Barik Awaj Vadhat Chalalet ( बारीक बारीक आवाज वाढत चाललेत )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
बारीक बारीक आवाज वाढत चाललेत या स्नेहा अवसरीकर यांच्या पहिल्यावहिल्या कथसंग्रहात माणसामाणसांतल्या नात्यांचे विविध अविष्कार पाहायला मिळतात. कुठे काका पुतण्यातल्या पारंपारिक नात्याच्या पलीकडे जाणारं, आपल्या पुतण्याबरोबरचं आत्मीय नातं जपणारे केशवकाका तर कुठे स्वत:च्या एकाकी आयुष्याचं प्रतिबिंब एका कबूतराच्या पिल्लात पाहून त्याच्याशी नातं जोडणार्या वृंदाताई. कधी आपल्या दिवंगत सावत्रसासूचा केवळ फोटो पाहून तिच्याशी नातं जुळवलेली नंदी तर कधी स्वत:च्या अस्तित्वाचं भान आल्यावर स्वत:शीच नातं जोडणारी मी. नवर्याला आलेल्या त्याच्या मैत्रिणीच्या मेल्स वाचून हादरून गेलेली एखादी सुभद्रा अखेर कुठलीच नाती संपूर्णपणे आपली असणार नाहीत, हे समजून घेते तर एखादी रश्मी काही नाती निर्घृणपणे तोडावी लागतात, याचं भान ठेवून ईश्वरबरोबरच आपलं नातं मर्यादित अंतरावर राखण्याची शहाणीव दाखवते. एकीकडे युनियनद्वारे संपूर्ण भारतातल्या रेडिओ स्टेशन्सवर काम करणार्या स्टाफशी नातं जोडू पाहणारी राधिका तर दुसरीकडे रेडिओतल्या आपल्या सहकार्याबरोबर निर्माण झालेलं अबोल, अस्फुट नातं मनातच ठेवत त्याच्यापासून दूर होणारी इशा...
ISBN No. | :9789392374685 |
Author | :Sneha Avasarikar |
Publisher | :Rohan Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :164 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |