akshardhara
Tathagat Gotam Buddha ( तथागत गोतम बुध्द )
Tathagat Gotam Buddha ( तथागत गोतम बुध्द )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
हे कलामांनो ! पुढे जाऊन तुम्ही स्वत:ला असे विचारा की, कोणता सिध्दान्त हा उत्कट इच्छा, द्वेष, भ्रम आणि हिंसा शिकवतो? हे सिध्दान्त तृष्णा, द्वेष, मूढता आणि हिंसा यांना सहायक नाहीत ना? हे कलामांनो ! हे एवढेच पुरेसे नाही. आणखीही पुढे जाऊन तुम्ही आणि पाहिले पाहिजे की, हा सिध्दान्त मनुष्याला मनोविकारांचा कैदी बनवत नाही ना? हा सिध्दान्त मनुष्याला इंद्रियाधीन बनवीत नाही ना ? त्याला हिंसेला प्रवृत्त करणारा नाही ना? त्याला सजीव प्राण्यांची हत्या करण्यासाठी घेऊन जात नाही ना? त्याला जे दिले नाही ते जबरदस्तीने घेण्यासाठी चोरी करण्याला प्रेरणा देत नाही ना? कामेच्छापूर्तीसाठी मिथ्याचार शिकविणारे नाहीत ना? म्हणजे कामेच्छापूर्तीसाठी दुसर्याच्या पत्नीमागे जाण्यास, असत्य भाषण करण्यास आणि अशासारखी दुसर्यांना दु:ख देणारी कृत्ये आचरणात आणण्याचे शिकवीत नाही ना? हे बुध्द! तर मग आम्ही नेमके काय करावे? हे कलामांनो ! अंतिमत:, तुम्ही त्या सिध्दान्ताबाबत स्वत:ला हा प्रश्न विचारला पाहिजे की, या सिध्दान्ताचा परिणाम वाईट, अहितामध्ये आणि दु:खात तर होणार नाही ना?
ISBN No. | :9789392482274 |
Author | :Vasant Gaikwad |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :paperbag |
Pages | :1276 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

