akshardhara
Dhyasaparva (ध्यासपर्व )
Dhyasaparva (ध्यासपर्व )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
19 व्या शतकाच्या उत्तरार्धात जन्माला आलेल्या सहा स्त्रिया आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जन्मलेल्या सहा स्त्रिया, याम्च मोठेपण, कर्तृत्व, स्त्रीत्वाच्या मर्यादा ऒळखून गगनाला घातलेली गवसणी आणि तरीही संसाराचा त्याग न करता, त्यातली सुख दु:ख, मुलंबाळं हे सर्व अगत्याने, प्रेमान सांभाळून केलेल विलक्षण काम आपल्याला स्तिमित करून जात. इथे समाविष्ट असलेल्या बारा जणींनी आत्मचरित्र, पत्र, कथा, कादंबरी, वैचारिक वैज्ञानिक या पध्दतीच मूलभूत म्हणाव अस लेखन केल आहे. या त्यांच्या पारदर्शक, प्रामाणिक लेखनामुळेच या स्त्रियांकदे आपल लक्ष वेधल जात. इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे यातील काही स्त्रिया या कर्मठ वातावरणात लहानाच्या मोठ्या झाल्या; परंतु त्यांच वागण, लिहिण हे जाती धर्मापलीकडच होत. यांतल्या कोणीच अशा विचारबाह्य गोष्टींना थारा देणार्या नव्हत्या. रमाबाई रानडेंपासून मृणाल गोरेंपर्यंत सर्व जणी महाराट्रातल्या आणि मराठी भाषक तर मॉं अन्नपूर्णादेवी या उत्तर प्रदेशातल्या ; परंतु शीलवती केतकर या परदेशातून इथे येऊन हिंदू झाल्या. मराठी भाषा, संस्कृती शिकल्या. इतकच काय, पती ज्ञानकोशकार केतकर यांच निधन झाल्यावरही त्या इथेच राहिल्या. नवर्याच जीवितकार्य पूर्ण करण्यासाठी, त्यांनी जे सोसल ते त्यांनी अत्यंत संयतपणे लिहिल आहे.
ISBN No. | :9789392482557 |
Author | :Madhuvanti Sapre |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :paperbag |
Pages | :174 |
Language | :Marathi |
Edition | :1 |

