akshardhara
Pidhi Dar Pidhi ( पिढी दर पिढी )
Pidhi Dar Pidhi ( पिढी दर पिढी )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
टायगर वांग या सरदाराने गरीब शेतकर्यांना लुटलय, त्यांच्यावर अत्याचार केलेत. क्रांतिकारकांची एक फळी तयार झालीय टायगरसारख्या सरदारांना शह देण्यासाठी. टायगरच्या सैनिकी शाळेत शिकणार्या मुलावर, युआनवर वेळ येते या क्रांतिकारकांमध्ये सामील होण्याची; पण वडिलांविरुध्द लढण त्याला योग्य वाटत नाही. तो त्याच्या आजोबांच्या गावी जाऊन शेतीत रमू पाहतो. गावातल्या लोकांचा विश्वास संपादन करू पाहतो. वडिलांशी पटत नाही म्हणून सावत्र आईकडे जाऊन राहतो, सावत्र बहिणीला, चुलते- चुलत्या, चुलत भावंडे यांना आपलस करतो. परदेशात शिकत असतानाही त्याचा हा उमदेपणा तेथील लोकांनाही भावतो. परदेशातून शिकून परत येतो, तेव्हाही कुटुंबातील समस्या सोडवण्याचा त्याचा प्रयत्न असतो. अनाथ मी लिंग त्याला आवडली तरी आधी तिला डॉक्टरीच शिक्षण घ्यायच आहे, याच भान ठेवून तिच्याशी लग्न तिच्याशी लग्न करायची घाई करत नाही. वडिलांनी करून ठेवलेल कर्ज फेडण हे कर्तव्य समजून तो नोकरी करायला लागतो. एकूणच, युआनची ही व्यक्तिरेखा दोन पिढ्यांमधील संघर्ष, चीनमधील तत्कालीन कृषी क्रांतिकारी वातावरण या पार्श्वभूमीवर चितारलेली असली, तरी त्याच्या समतोल वृत्तीमुळे या कादंबरीतून अश्वासकतेचा एक सूर उमटताना दिसतो. वास्तवता भावपूर्णतेचा अनोखा संगम असलेली ही कादंबरी आहे.
ISBN No. | :9789392482694 |
Author | :Pearl Buck |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Bharati Pande |
Binding | :paperbag |
Pages | :364 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |