Skip to product information
1 of 2

akshardhara

Trutiyanetra ( तृतीयनेत्र )

Trutiyanetra ( तृतीयनेत्र )

Regular price Rs.360.00
Regular price Sale price Rs.360.00
Liquid error (snippets/price line 128): divided by 0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

विजयनगर साम्राज्याचा सम्राट देवरायाने हंपीच्या विरूपाक्ष मंदिरातील शिवप्रतिमेवर ‘तृतीय नेत्र’ म्हणून एक दुर्मीळ रक्तवर्णी हिरा बसवला. 

सोळाव्या शतकातील मुस्लीम आक्रमणाच्या काळात रहस्यमयरीत्या ‘तृतीय नेत्र’ गायब झाला आणि त्या विनाशकारी धामधुमीनंतर हंपी शहरच नष्ट झाल्याने तो विस्मरणातही गेला.

एकविसाव्या शतकात अचानक काही सूचक जुनी कागदपत्रे हाती आल्यावर गुप्तपणे आंतरराष्ट्रीय टोळीच्या हस्तकांनी निर्दय होत त्याचा शोध सुरू केला. 

सुरत स्वारीच्या दरम्यान तृतीय नेत्र शिवाजी महाराजांच्या हाती लागून तो महाराष्ट्रात आला असावा, या शंकेने कर्नाटकात सुरू असलेला शोध महाराष्ट्रात आला. 

एका पाठोपाठ एक रक्तरंजित घटना घडू लागल्या. पोलीसही चक्रावले. 

पण ही खुनांची मालिका आणि त्यामागील रहस्य शोधत बदमाशांच्या मार्गात आडवे आले एक इतिहास संशोधक धाडसी तरूण जोडपे. 

कोठे होता एवढा काळ तो तृतीय नेत्र? काय होते त्याचे रहस्य? शेवटी कोणाच्या हाती लागला तो? 

एक जळजळीत रहस्यमय थरार कादंबरी 

तृतीय नेत्र... !

ISBN No. :9789392753190
Author :Sanjay Sonavani
Publisher :Prajakt Prakashan
Binding :Paperback
Pages :296
Language :Marathi
Edition :2023
View full details