akshardhara
Vedanecha Krus ( वेदनेचा क्रूस )
Vedanecha Krus ( वेदनेचा क्रूस )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
लेखकांची ही कादंबरी म्हणजे व्यक्तिचित्रात्मक साहित्यकृतीची एक अत्यंत सुरेखपणे घडवलेली तितकीच सुरेख प्रतिमा आहे. गेल्या पिढीतील प्रतिभाशाली चित्रपटकार गुरुदत्त यांच्या खर्याखुर्या जीवनातील विलक्षण घटनांवर कलाकृती निर्माण करणे, हे कोणत्याही लेखकाला शिवधनुष्य पेलण्यासारखे आव्हानात्मक वाटते, परंतु लेखकांनी ते कठीण काम जातिवंत कलाकाराच्या जाणकारीने, जीवनाबद्दलच्या प्रगल्भ चिंतनाने एका उत्तुंग वाड्मयीन पातळीवर नेले आहे. गुरूदत्त- गीता दत्त आणि वहिदा रहेमान या मानवी पातळीवर जन्म घेतलेल्या तीन अमानवी अदभुत, कलेला जीवन मानणार्या, मनस्वी-देहस्वी व्यक्तिमत्त्वांच्या अलौकिकपणाची ही कहाणी. प्रेम, प्रीती, भक्ती, आसक्ती, उत्कटता, असीम समर्पण आणि असीम तुटलेपण, मनाची आणि आत्म्याची तडफड, निर्मितीची आणि विसर्जनाची जीवघेणी तगमग आणि शेवटी एक अलौकिक अमर दु:खान्त! या तीन कलाकारांची आणि त्यांच्या भोवतालच्या मानुष-अमानुष विश्वाची ही अविस्मरणीय कथा लेखकांनी विलक्षण ताकदीने या कादंबरीमध्ये वाचकांसमोर सादर केली आहे.
ISBN No. | :9789393528254 |
Author | :Laxmikant Deshmukh |
Publisher | :Majestic Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :270 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

