Nate Apulakiche ( नाते आपुलकीचे )
Nate Apulakiche ( नाते आपुलकीचे )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आईच्या पदराखालची सावली संपली की, उन्हाचे किती चटके सहन करावे लागतात हे त्याचे तोच जाणे ! पण ठेचकाळून जखमी होत रक्तबंबाळ झाल्यावर हळदीचा लेप लावणारे जसे भेटतात, तसे जखमेवर मीठ चोळणारेही. आईच्या मायेविना अनाथालयात वाढलेल्या मुलांकडे समाज कसा पाहतो? सरकार कसे बघते? मोकळी हवासुध्दा त्याच्या मालकीची कोणी ठेवत नाही. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्या मुलाच घर उन्हातच असायला हव का ?
कोकणातल्या मन्यान नकळत्या वयात वडिलांच छत्र गमावल आणि मन्याला बालकाश्रमात दाखल केल गेल. या बालकाश्रमातील एकेक अनुभव अंगावर काटा आणणारे, मुलांसाठी शारीरिक व मानसिक अनारोग्य निर्माण करणारे. पण याबद्दल समाजाविषयीची कोणतीही कटू भावना मनात न ठेवता मन्याने बालकाश्रमातील काळ संपवून व्यावहारिक जगात पाऊल ठेवल. आतापर्यंत अनाथपणाचा अनुभव घेणारा मन्या तसाच अनुभव घेणार्या मुलांचा आता मनोजदादा झाला. आपुलकीने आधार बनला.
ISBN No. | :9789393529213 |
Author | :Manoj Dandekar |
Publisher | :Navachaitanya Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :120 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |