akshardhara
Nivadak Joseph Tuskano Vidnyan Katha Lekhrang ( निवडक जोसेफ तुस्कानो विज्ञान कथा लेखरंग )
Nivadak Joseph Tuskano Vidnyan Katha Lekhrang ( निवडक जोसेफ तुस्कानो विज्ञान कथा लेखरंग )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
ज्यो सिध्दहस्त विज्ञान लेखक आहेच, शिवाय फार कोणाला माहीत नसणार्या व ज्योचं व्यक्तिमत्त्व ठळक करणार्या ज्योच्या आयुष्यातल्या अनेक घटना मला माहीत आहेत. त्यातल्या फक्त तीन घटना इथे मला थोडक्यात सांगाव्याशा वाटतात.
ज्योने केलेली चोरी. सहा-सात वर्षांचा असताना ज्योने एका काकाच्या खिशातले आठ आणे चोरले. त्याच्या खूप पेन्सिली विकत घेतल्या आणि त्या मित्रांना वाटल्या.
पन्नास- पंचावन्न वर्षांचा असताना ज्योने स्वत:च्या छानशा मारूती झेनची चावी माझ्याकडे दिली आणि म्हणाला, “आजपासून ही गाडी तुझी. बायपास झाल्यानंतरही तू तुझी कोर्टातली कामं करायला पुणे-सातारा, वेळी अवेळी एसटीने फिरत असतोस. मला आवडत नाही. उद्यापासून एसटी बंद. गाडीने जायचे."
ज्योचे काका बैलगाडी हाकताना बैलांना काठीने मारायचे. त्या काठीच्या टोकाला त्यांनी खिळा लावला होता. तो खिळा ते खूपदा बैलांच्या शेपटीखाली खुपसायचे. ज्योला ते सहन होत नसायचं. तो रडायचा, भेकायचा... काकांना त्याचं रडणं कळत नसायचं. बैलांना असंच काहावं लागतं, हे त्याला समजावं म्हणून काकांनी बैलगाडी त्याच्या हातात दिली. आणि काही दिवसांतच ज्यो काठी न वापरता काकांपेक्षाही अधिक कौशल्याने गाडी हाकू लागला...... तर हा खरा ज्यो.
ISBN No. | :9789393529268 |
Author | :Manoj Acharya |
Publisher | :Navachaitanya Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :328 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

