akshardhara
A Diary Of A Young Girl ( द डायरी ऑफ ए यंग गर्ल )
A Diary Of A Young Girl ( द डायरी ऑफ ए यंग गर्ल )
Share
Couldn't load pickup availability
Author: Anne Frank
Publisher: Goel Prakashan
Pages: 303
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Dr Kamlesh Soman
नाझींनी केलेल्या ज्यू नरस्ण्हाराचा बळी ठरलेली आणि विख्यात किशोरवयीन रोजनिशीकार असलेली अॅनेलिस मेरी( अॅन ) फ्रॅंक! अॅन फ्रॅंक हिचे वडील ओटो फ्रॅंक हे पहिल्या महायुध्दात जर्मन सैन्यात लेफ्टनंट या पदावर होते. अॅन फ्रॅंकचे वास्तव्य बहुतेक काळ नेदरलॅंडसमधील मस्टरडॅममध्ये किंवा त्याच्या आसपासच्या भागातच होते. जुलै १९४२ पासून ज्यू नागरिकांचा छळ खूप मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्यावर हे कुंटुंब ऒटो फ्रॅंक याच्या कंपनीच्या मागच्या बाजूला असलेल्या एका तात्पुरत्या निवार्यात राहू लागले. त्या गुप्त निवार्याला त्यांनी सिक्रेट अनेक्स असे नाव दिले होते. १२ जुन १९४२ ते १ ऑगस्ट १९४४ या काळात अॅन फ्रॅंक रोजनिशी लिहित होती. अॅन सुमारे १५ वर्षाची असताना जर्मनांना त्यांच्या राहण्याचा जागेचा पत्ता लागला आणि अॅन, तिचे कुटुंबीय आणि त्यांच्या बरोबर तिथ्र राहणारी इतर काही मंडळी यांना अटक करून त्यांची रवानगी त्यांनी नाझी छळछावण्यांमध्ये केली. १९४५ साली त्या छावण्यांमध्ये टायफस रोगाची साथ पसरली. त्याचा संसर्ग मारगॉट आणि अॅन या दोघींनाही झाला आणि त्यातच फेब्रुबारी किंवा मार्च १९४५ मध्ये अॅनचा मृत्यू झाला. अॅनच्या कुटुंबातील एकच व्यक्ती तेथून जिवंतपणे बाहेर आली, ती म्हणजे अॅनचे वडील ओटो फ्रॅंक ! मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या रोजनिशी जगापुढे आणाव्या, या हेतूने अॅन फ्रॅंक - द डायरी ऑफ अ यंग गर्ल अशा नावाने १९५२ साली ही रोजनिशी प्रकाशित झाली आणि ती जगभर प्रचंड गाजली.
ISBN No. | :9789393624260 |
Author | :Anne Frank |
Publisher | :Goel Prakashan |
Translator | :Dr Kamlesh Soman |
Binding | :Paperback |
Pages | :303 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |