akshardhara
Bharatiy Vidnyanyogi ( भारतीय विज्ञानयोगी )
Bharatiy Vidnyanyogi ( भारतीय विज्ञानयोगी )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आपला भारत देशात आजपर्यंत अनेक विज्ञानमहर्षी, महान वैज्ञानिक, शास्त्रज्ञ व संशोधन होऊन गेले आहेत. या पुस्तकात प्राचीन, अर्वाचीन व आधुनिक काळातील काही निवडक वैज्ञानिकांची व त्यांच्या शोधांची माहिती दिली आहे. या शास्त्रज्ञांचे संशोधन कार्य सार्या मुलामुलींना नक्कीच प्रेरणादायी असेच आहे. या वैज्ञानिकांनी आपला थोडासाही वेळ वाया घालविला नाही. त्यांच्यापासून त्यांची अभ्यासूवृत्ती, वेळेचा सदैव सदुपयोग कसा करावा, श्रमनिष्ठा, जिद्द, चिकाटी, प्रयत्नसातत्य, नावीन्याचा शोध घेण्याची वृत्ती, ज्ञानपिपासा, कोणत्याही संकटांना धैर्याने तोंड देण्याच्या मानसिक स्थैर्याची जोपासना व विवेकाने त्यातून मार्ग काढण्याची खंबीर प्रवृत्ती आदी जीवनोपयोगी सदुणांची शिकवणही विद्यार्थ्यांना मिळेल. त्यातून त्यांच्या बुध्दीचा विकासही होईल, आपल्या शास्त्रज्ञांप्रती असलेला आदरही वाढेल नि आपल्या देशाविषयीचा अभिमानही नक्कीच वृध्दिंगत होईल यात मुळीच शंका नाही. जिज्ञासू मुलामुलींसोबत स्पर्धा परीक्षांच्या सामान्य ज्ञान ह्या विषयाचा अभ्यास करणार्या महाविद्यालयीन अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी आणि ज्ञानपिपासू व रसिक शिक्षकांसाठीही हे माहितीवर्धक पुस्तक खूप उपयुक्त आहे.
ISBN No. | :9789393757388 |
Author | :Devaba Patil |
Publisher | :Vishwakarma Publications |
Binding | :Paperback |
Pages | :136 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |
