akshardhara
Bhaktichandra ( भक्तिचंद्र )
Bhaktichandra ( भक्तिचंद्र )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
नामदेवान जे मनात योजले होत, ते सगळ पूर्ण केल. प्रवास करणार्या वाटसरूची ठिकठिखाणी सोय झाली. त्यांना वाटेत मुक्काम करता येऊ लागला. तहानेला पाण्याची व्यवस्था झाली. कसलाही बोभाटा, कसलाही गाजावाजा न करता नामदेवान केलेल ठिकठिकाणच हे काम लोकांना एक आत्मिक बळ देऊन गेल. मनात असेल तर आपल ब्रीद राखून, सरकारी मदत न घेता काम करता तेय, हे लोकांच्याही लक्षात आल आणि हे सामर्थ्य भक्तीच आणि जाती धर्मनिरपेक्ष समाजव्यवस्थेच आहे, हेही सर्वांना समजल. नामदेवान न बोलता ते करून दाखवल. भक्तीतून एकात्मता आणि आत्मबल साधता येत, हे लोकांच्या मनात रूजल. यातूनच धर्म आनि संस्कृतीच रक्षण होत हेही लोकांना उमजल. नामदेवाच्या भक्तिअधिष्टित कार्याच हे फार मोठ यश होत. समाजसेवकाचा कुठलाही अभिनिवेश न बाळगता,कुठल्याही घोषणा अथवा शब्दांचे बंबाळ न करता, ईश्वराची भक्ती करता करता समाजाच ऎक्य साधता येत, हेच नामदेवान दाखवून दिल. जुलमी यवनी सत्तेला त्यान कुठेही प्रत्यक्ष विरोध केला नाही. प्रसंगी पातशहाची सामला झाला, प्रसंगी जिवावर बेतल; पण आपल ईश्वरभक्तीच, भक्तिपरंपरेच ब्रीद नामदेवान सोडल नाही. त्याची भक्तिनिष्ठा इतकी प्रखर होती की, यवनी सत्तेलाही त्याचा नाद सोडावा लागला. विशेष गोष्ट अशी की, वरून निरूपद्रवी, निष्क्रिय वाटणारा हा भक्तिमार्ग जनसामान्यांना किती आत्मिक सामर्थ्य देतो आहे, याची यवनी आक्रमकांना गंधवार्तासुध्दा नव्हती. हेच तर नामदेवाच्या भक्तिअधिष्ठानाच वैशिष्ट्य होत आणि त्याच हे भक्तिअधिष्ठानाच वैशिष्ट्य होत आणि त्याच हे भक्तिअधिष्ठानसुध्दा डोळस होत. शुध्द होत. त्यान सांगितलेली श्रध्दा अंधश्रध्दा नव्हती.
ISBN No. | :9789394258600 |
Author | :Manjushri Gokhale |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :paperbag |
Pages | :366 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |