akshardhara
Sukhacha Lapandav ( सुखाचा लपंडाव )
Sukhacha Lapandav ( सुखाचा लपंडाव )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 182
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबातील सुशील, सुस्वभावी कॉलेजयुवती पुष्पमाला, डॉ. हेडगेवार यांच्या प्रेरणेने संघकार्यात निष्ठेने भाग घेणारा सुखवस्तू व सुशिक्षित तरूण कुमार, तसेच गौर वर्णाचे, बंगाली वाटावेत असे सालस युवक डॉ. सतीश या तिघांच्या प्रेमकहाणीतून निर्माण झालेल द्वंद्व या कादंबरीतून चित्रित केल गेलय. प्रवासादरम्यान संकटातून सोडवणारा कुमार पुष्पमालेला आपलासा वाटतो; परंतु कुमारची आधीपासूनची मैत्रीण माधुरीसाठी त्याच्या प्रेमाला ती नकार देते. त्यामुळे त्याची दारूण निराशा होऊन तो एकाएकी नाहीसा होतो. तसेच तिच्यावर मनापासून प्रेम करणार्या डॉ. सतीश यांच्याबरोबर जाण्यासही पुष्पमाला नकार देते. त्यामुळे ते निराश होऊन व्यसनाच्या आहारी जातात. अचानक नाहीसा झालेला कुमार सैन्यात भरती होतो आणि युध्दात मारला जातो. तर विवाहित स्त्रीला फूस लावून पळवल्याच्या आरोपावरून डॉ. सतीश यांना तुरूंगवास भोगावा लागतो. अर्थात पोलीस अधिकारी दादासाहेब यांनीच सूडभावनेन डॉक्टरांविरूध्द हा बनाव घडवून आणलेला असतो; कारण त्यांची मुलगी अचला हिच्या प्रेमाला डॉ. सतीश यांनी नकार दिलेला असतो. पुष्पमालेच्या जीवनात चाललेला सुखाचा लपंडाव साध्या, सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोचतो. स्वातंत्र्यपूर्व काळाच्या पार्श्वभूमीवर रंगलेल भावनाट्य.
ISBN No. | :9789394258853 |
Author | :B D Kher |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :182 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |

