akshardhara
Gher ( घेर )
Gher ( घेर )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
पुढे इंग्रजानी या जमातीला चोरी करणारी, दरोडे घालणारी जमात म्हणून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. तिथपासून या जमातीने समाधानाचा श्वास कधी अनुभवलाच नाही. इंग्रजांचे अनन्वित अत्याचार सोसत, ज्या गावात आसरा घेतील तेथील लोकांनी केलेल्या अपमानाचा कडू घोट मुकाट्याने गिळत या जमातीच्या अनेक पिढ्या जगल्या आणि नष्ट झाल्या. बोरुपासून ताग बनविण्याचा मूळ व्यवसाय इमाने इतबारे करणाऱ्या व चोरीपासून चार हात लांब राहणाऱ्या या जमातीचा मन हेलावून टाकणारा भोगवाटा या कादंबरीत कथन केला आहे. चोरीच्या आरोपांच्या भीतीने एका ठिकाणी वास्तव करण्यास घाबरणाऱ्या आणि गावपांढरीपुढे बोलू न शकणाऱ्या या जमातीतील राघो नावाचा नायक अत्यंत हालअपेष्टा सोसल्यानंतर एका ठिकाणी कायमस्वरूपी राहण्याचा निर्णय घेतो, ते आता तरी अन्याय व अत्याचाराच्या दुष्टचक्राला लगाम बसेल या आशेने ! भामटी जमातीच्या अपरिमित कष्टांना स्थैर्याचा आशावादी उतारा देणारी एक हृदयस्पर्शी कादंबरी.
ISBN No. | :9789395139489 |
Author | :Dr Vasudev Dahake |
Publisher | :Sakal Prakashan |
Binding | :paperback |
Pages | :461 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |

