akshardhara
Karveer Chatrapati Indumati Ranisaheb ( करवीर छ्त्रपती इंदुमती राणीसाहेब )
Karveer Chatrapati Indumati Ranisaheb ( करवीर छ्त्रपती इंदुमती राणीसाहेब )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
ही जीवनगाथा आहे इंदुमती राणीसाहेबांची. राजर्षी शाहू महाराजांच्या द्वितीय पुत्राची, प्रिन्स शिवाजी यांची ही पत्नी. विवाहानंतर एकच वर्षांनी प्रिन्स शिवाजी यांचा अपघाती मृत्यूमुळे अवघ्या तेराव्या वर्षी त्यांना वैधव्य आल; पण शाहू महाराजांनी घरादाराचा विरोध पत्करून इंदुमतीदेवींना शिक्षण दिलच; पण समाजसेवेचे धडेही दिले. त्यांना चारचाकी चालवायला शिकवली. शिकारगाडी चालवण्याचेही प्रशिक्षण दिल. इंदुमती देवींना डॉक्टर करण्याच राजर्षी शाहूंच स्वप्न मात्र प्रत्यक्षात येऊ शकल नाही; कारण त्या मॅट्रिक व्हायच्या आधीच शाहू महाराजांच निधन झाल आणि घरातील कट्टर विरोधामुळे वैद्यकीय शिक्षणाला त्या मुकल्या. संस्थान खालसा होण्याच्या वेळेस तनखाबंदेमुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ऒढावल. तरीही त्या नेटाने पुढे जात राहिल्या. स्त्रियांसाठी शैक्षणिक संस्था काढून त्यासाठी झटणार्या, कलासक्त, वत्कृत्वनिपुण, कलाकारांना आश्रय देणार्या, उत्तम वाचक, प्रसिध्दीपराड्मुखता इ. गुण असणार्या इंदुमती राणीसाहेबांचा हा जीवनपट त्यांच्या जीवनातील चढ उतार दर्शवतो.
ISBN No. | :9789395477666 |
Author | :Dr Suvarna Naik Nimbalkar |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :176 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

