Akshardhara Book Gallery
Aadibandhatmak Samiksha (आदिबंधात्मक समीक्षा)
Aadibandhatmak Samiksha (आदिबंधात्मक समीक्षा)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr M S Patil
Publisher: Varnamudra Publishers
Pages: 191
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
आदिबंधात्मक समीक्षा
'समीक्षा' या साहित्यप्रकाराविषयीची उदासीनता ही जगभरातील सर्वच भाषांतील पर्यावरणात गेल्या काही दशकांत जाणवू लागली आहे. मराठी भाषा त्याला अपवाद नाही. या उदासीनतेमुळे समीक्षाविषयक अनेक पुस्तके 'Out of Print' झालेली आहेत. स्मृतिशेष ज्येष्ठ समीक्षक डॉ. म. सु. पाटील यांचे 'आदिबंधात्मक समीक्षा' हे त्यापैकीच एक पुस्तक. जागतिक समीक्षा व्यवहारात मानसशास्त्रीय अभ्यासाच्या मदतीने केली जाणारी आदिबंधात्मक समीक्षा ही एक महत्त्वाची समीक्षा पद्धती मानली जाते. जगात विविध भाषांतून आदिबंधात्मक समीक्षेविषयी भरपूर लिखाण केले गेले आणि अजूनही केले जात आहे. मराठी भाषेत मात्र गंगाधर पाटील यांनी या समीक्षा पद्धतीची मराठी वाचकांना व अभ्यासकांना ओळख करून दिल्यानंतर डॉ. म. सु. पाटील यांचा अपवाद वगळता या समीक्षा पद्धतीबद्दल फारसे सैद्धांतिक किंवा उपयोजित या स्वरूपाचे लेखन झालेले दिसत नाही. अलीकडे अमळनेरचे भरतसिंग पाटील यांनी आदिबंधात्मक समीक्षेचे उपयोजन करून दोन पुस्तके लिहिली आहेत. त्या पुस्तकांनाही अपवादात्मकच मानले पाहिजे. डॉ. म. सु. पाटील यांचे हे अत्यंत मोलाचे पुस्तक अभ्यासासाठी सुद्धा उपलब्ध असू नये, ही काही भूषणावह बाब नाही. म्हणून वर्णमुद्रा प्रकाशनाद्वारे हे पुस्तक वाचकांना व अभ्यासकांना पुनर्मुद्रित करून उपलब्ध करून दिले जात आहे. यासाठी मनोज मित्र असला तरी त्याचेही आभारच मानले पाहिजेत. मुनव्वर राणा यांचे दोन शेर आठवतात
लेखक. डॉ. म. सु. पाटील
प्रकाशक. वर्णमुद्रा पब्लिशर्स
