Akshardhara Book Gallery
Aajachya Vishwache Aart (आजच्या विश्वाचे आर्त)
Aajachya Vishwache Aart (आजच्या विश्वाचे आर्त)
Couldn't load pickup availability
Author: Dipak Karanjikar
Share
Publisher: Shabdalay Prakashan
Pages: 176
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
आजच्या विश्वाचे आर्त
जागतिक राजकारण, अर्थकारण आणि व्यापार यातून पोसली गेलेली अन्यायकारक विषमता, भारतासारखे अर्धविकसित किंवा अविकसित देश यांच्यावर लादलेले अन्याय- अत्याचार, जागतिक बाजारपेठेचे उग्र अत्याचारी स्वरूप, वैज्ञानिक-तांत्रिक विकास, प्रतिजैविके इत्यादिंनी जगात उडवून दिलेला हाहा:कार याबद्दल श्री. करंजीकर यांनी आकडेवारी देत मार्मिकतेने लिहिले आहे. आधुनिक बाजारपेठेच्या तत्त्वज्ञानाने आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने तर मानजातीने विकसित केलेल्या नैतिक मूल्यांना पार उलटेपालटे करून टाकले आहे. 'सावध ऐका पुढल्या हाका !' या आणि त्यापुढच्या लेखात मनुष्यजातीच्या भवितव्याबद्दल ज्या गंभीर शंका व्यक्त केल्या त्या साधार व समर्थनीय आहेत. श्री. दीपक करंजीकर यांनी हाताळलेल्या जगड्व्याळ व गुंतागुंतीच्या विषयावर सुसंगतीने लिहिणे हे कठीण काम आहे; ते साध्य केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. अरुण साधू, ज्येष्ठ लेखक, माजी साहित्य संमेलनाध्यक्ष
लेखक : दीपक करंजीकर
