Akshardhara Book Gallery
Aakashache Rang (आकाशाचे रंग)
Aakashache Rang (आकाशाचे रंग)
Share
Couldn't load pickup availability
Author: Devba Shivaji Patil
Publisher: Navinya Prakashan
Pages: 64
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
आकाशाचे रंग
आकाशाचे रंग' ह्या पुस्तकामध्ये लेखकाने दोन जुळ्या बहिणी व त्यांची प्राध्यापिका मावशी ह्यांच्या सुसंवादांद्वारे आकाशासंबंधित विज्ञानाची काही तत्त्वे सोपी करून सुंदरशा भाषेत मुलांसाठी मांडली आहेत. जसे आकाश हे निळ्या रंगाचेच का आहे? सकाळी आकाश तांबडे का दिसते? संध्याकाळी आकाशात वेगवेगळे रंग कोठून येतात ? दिवसा सूर्य पांढरा का दिसतो ? सूर्य पूर्वेकडेच का उगवतो व पश्चिमेकडेच का मावळतो? तो उगवताना व मावळताना मोठा का दिसतो? दुपारी आपण सूर्याकडे का बघू शकत नाही? आदी माहिती मुलांना समजेल अशा सोप्या शब्दांमध्ये सांगितली आहे. आकाशात ढग असले तरी आपणास खाली प्रकाश कसा काय दिसतो? सकाळी झुंजूमुंजू कसे होते? संध्याकाळी संधिप्रकाश कसा पडतो ? सूर्योदय व सूर्यास्त कसा होतो? दिवसा उजेड व रात्री अंधार कसा पडतो? दिवस, महिना, वर्ष कसे बनते? लीपवर्ष कसे येते? दिवस व रात्र हे बारा बारा तासांचेच का असतात? दोन्ही मिळून रात्रदिवस चोवीस तासांचा कसा बनतो ? ह्या प्रक्रियाही आकलनसुलभ भाषेत वर्णिल्या आहेत.
ह्याच अनुषंगाने येणाऱ्या पाण्यात खडा टाकल्यास लहरी कशा निर्माण होतात? साबणाचे फुगे कसे तयार होतात ? गोलच का असतात? ते हवेत कसे उडतात व कसे फुटतात? वातावरणात धूळ कोठून येते? समुद्राचा रंग निळा का आहे? पान खाल्याने तोंड लाल का होते ? मेहंदीने हात कसे रंगतात ? वेगवेगळे विद्युत दिवे कसे बनतात व कार्य करतात? इ. गोष्टींचेसुध्दा सहजगम्य खुलासे केले आहेत. ह्या छोट्याशा पुस्तिकेत आलेल्या विज्ञानाच्या संज्ञा ह्या सरळ सरळ स्पष्ट करून सांगितलेल्या आहेत, त्यामुळे हे पुस्तक शालेय विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर अभ्यासू शिक्षक-पालकांनासुध्दा उपयोगी आहे.. सौ. मनीषा एम. खैरे, प्रकाशक, नावीन्य प्रकाशन
लेखक : देवबा शिवाजी पाटील
