Akshardhara Book Gallery
Aayushyavar Bolto Kahi (आयुष्यावर बोलतो काही)
Aayushyavar Bolto Kahi (आयुष्यावर बोलतो काही)
Couldn't load pickup availability
Author: Dr. Madhukar Sabne
Share
Publisher: Sakal Prakashan
Pages: 173
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
आयुष्यावर बोलतो काही
ही गोष्ट आहे थरथरत्या हातांनी; पण जिद्दीने लेखणी हाती धरत अनुभवांची शिदोरी पुढील पिढीकडे देणाऱ्या एका संशोधकाची... ही गोष्ट आहे उमेदीने आयुष्य जगणाऱ्या डॉ. मधुकर साबणे यांची. डॉ. साबणे यांचे हे आत्मचरित्र म्हणजे केवळ आठवणींचा मागोवा नाही, तर बदलत्या समाजाच्या, हरवलेल्या नातेसंबंधांच्या आणि टिकून राहिलेल्या मूल्यांच्या शोधाचा प्रवास आहे. पूर्वी आजी-आजोबा, नातवंडे एकत्र राहत असत, एकमेकांच्या सहवासात समृद्ध होत असत. आज मात्र तंत्रज्ञानाने माणसे जोडली असली, तरी मने तुटली आहेत. अशा परिस्थितीत नातवंडांच्या प्रेमळ आग्रहाखातर डॉ. साबणे यांनी लिहिलेले हे पुस्तक वाचकांसाठीदेखील एक अमूल्य ठेवा आहे. एका सामान्य कुटुंबातून आलेले साबणे आपल्या कार्यकतृत्वाच्या जोरावर संशोधनाच्या क्षेत्रात, भरीव कामगिरी तर करतातच; पण त्याचबरोबर येणाऱ्या प्रत्येक संकटाला धीराने सामोरे जातात. त्यांचे पूर्वीचे सामान्य कुटुंब, आई-वडिलांनी केलेले कष्ट, भाऊ-बहीण यांच्याशी असलेले प्रेमळ नाते, उच्च शिक्षणाचे ध्येय, लेखनाचा प्रवास आणि वेगवेगळ्या टप्प्यावर केलेले पर्यटन... हे सगळे अनुभव वाचकाला अंतर्मुख करतात. हे एक आत्मचरित्र तर आहेच; पण त्याचबरोबर हे एका पिढीचे, एका संस्कृतीचे आणि एका जिवंत अनुभवाचे दस्तऐवजीकरण आहे.
लेखक. डॉ. मधुकर साबणे
प्रकाशक. सकाळ प्रकाशन
