Akshardhara Book Gallery
Adbhut Kailas (अद्भुत कैलास)
Adbhut Kailas (अद्भुत कैलास)
Couldn't load pickup availability
Author: Subhash Vaidya
Share
Publisher: Subhash Shivling Vaidya
Pages: 376
Edition: 2025
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
अद्भुत कैलास
शिवाचे निवासस्थान असलेल्या कैलास पर्वताची परिक्रमा श्री. सुभाष शिवलिंग वैद्य यांनी अठ्ठावीस वेळा केली. हा एक चमत्कारच म्हणावा लागेल! त्याशिवाय त्यांना लाभलेल्या अनेक विरळा संधी, दीड हजाराहून अधिक यात्रींना त्यांनी घडवलेली कैलास परिक्रमा हे सर्व अकल्पनीय आहे. अद्भुत कैलासमध्ये गेल्या पंचवीस वर्षात कैलासाशी असलेले नाते कसे पक्के होत गेले, त्यातून आध्यात्मिक व अलौकिक ईश्वरीय प्रसाद कसा लाभत गेला याची कहाणी श्री. सुभाष वैद्य स्वत: सांगत आहेत.
दिव्य कैलास परिसर, रम्य मानस-सरोवर यांच्या अनेक सुंदर छायाचित्रांसकट दुर्मीळ, मौलिक माहिती देणारे हे पुस्तक अद्वितीय आहे. या पुस्तकासोबत "क्युआर कोडद्वारे जोडलेले व्हिडिओज " तसेच वर्णिलेले रंजक, चित्तथरारक अनुभव हे वाचकाला कैलासाची प्रत्यक्ष नाही तरी मानस भेट प्रभावीपणे घडवून आणतात.
श्रद्धा व भक्तीच्या जीवावर मानवी झेप कुठपर्यंत जाऊ शकते याची तसेच अंतर्बाह्य परिवर्तन घडल्याची साक्ष देणारी अनुभवकथने या पुस्तकात आली आहेत. चकित करून टाकणाऱ्या या अशा अनुभूतींचे वर्णन कुणालाही निःसंशय अंतर्मुख करेल.
लेखक : श्री. सुभाष शिवलिंग वैद्य
