Akshardhara Book Gallery
Adney (अज्ञेय)
Adney (अज्ञेय)
Share
Couldn't load pickup availability
Author: Rekha Baijal
Publisher: Mehta Publishing House
Pages: 106
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
अज्ञेय
"तुमच्या मूर्ती म्हणजे काय असतं?" आदिवासी "मूर्ती दगडाची, धातूची प्रतिकृती." चेतन "प्रतिकृती कोणाची?” आदिवासी "माणसांची." चेतन "माणसांच्या मदतीला येतात ते देव. आमच्या मदतीला आमची झाडं येतात म्हणून आम्ही त्यांची पूजा करतो. झाडात जीव असतो. ती पुनःपुन्हा उगवतात. तुमचे धातूचे देव असे पुनःपुन्हा उगवतात का? किमान मातीच्या मूर्ती तरी तुम्ही करायला हव्यात. माती गर्भार राहते. मूर्ती फुटली, तर त्या मातीतून काही ना काही जन्माला येतं; झाडं, किडे, प्राणी! कारण माती मूर्तिरूपात असताना आपण श्रद्धा पेरलेली असते. धातू तर साधा ध्वनी स्वीकारू शकत नाही. त्याचा प्रतिध्वनी तो परत करून टाकतो. तो तुमच्या प्रार्थना काय स्वीकारेल? अभिप्राय
अज्ञेय-प्रतिभेचा परिपक्व आविष्कार माणूस अन् निसर्गातले वाढते अंतर, आपल्यातल्या चंगळावादातून अंकुरलेला भोगवाद, नैतिकेविषयी बदललेल्या संकल्पना, कीर्ती, अहंभाव या मोहजालाची आपल्या शरीराभवतीची पकड, आपल्या स्वप्नपूर्तीच्या वाटेवरचे उंचसखल खाचखळगे या साऱ्या धवलकृष्ण पार्श्वभूमीवर आयुष्याला रंगीत, सुगंधित करण्याची माणसाची केविलवाणी धडपड... सहा प्रवाशांची ही प्रवाही कथा प्रत्येक पानावर एक नवा धडा शिकवून जाते.
-डॉ. विजय पांढरीपांडे
पंचधारा, जुलै ते डिसेंबर २०१६
लेखक : रेखा बैजल
प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस
