Akshardhara Book Gallery
Agnishikha : Bharatiya Mahila Vaidnyanik (अग्नीशिरवा भारतीय महिला वैज्ञानिक)
Agnishikha : Bharatiya Mahila Vaidnyanik (अग्नीशिरवा भारतीय महिला वैज्ञानिक)
Share
Couldn't load pickup availability
Author: Tejaswini Desai
Publisher: Lokvangmaya Gruh
Pages: 168
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Agnishikha : Bharatiya Mahila Vaidnyanik (अग्नीशिरवा भारतीय महिला वैज्ञानिक)
मनुस्मृतीच्या वर्चस्वाखालील भारतीय समाजात महिलांवर खूपच अन्याय झाला. संशोधनक्षेत्रही त्यास अपवाद नाही. पुरुष संशोधक प्रयोगशाळेत महिलांना प्रवेश देत नसत. कमला सोहोनींची आय.आय.एससी. मधील प्रवेशाची कथा सर्वश्रुत आहे. स्वातंत्र्योत्तर काळात सामाजिक परिस्थितीत बदल होऊ लागला. याचे श्रेय भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांना जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली देशात अनेक संशोधन संस्थांची उभारणी झाली. मूलभूत विज्ञान, वैद्यकीय, अभियांत्रिकी अशा क्षेत्रात महिलांचा वावर दिसू लागला. शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार विजेत्या असिमा चॅटर्जी पासून वैद्यकीय क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या डॉ. सीता आचार्य, डॉ. पद्मकुमारी अग्रवाल, डॉ. इंदिरा हिंदुजा, औषधी वनस्पतींचा अभ्यास करणाऱ्या डॉ. जानकी अम्मल, भौतिकशास्त्रज्ञ अन्ना मनी, डॉ. रोहिणी गोडबोले, डॉ. अदिती डे, भूगर्भशास्त्रज्ञ सुदिप्ता सेनगुप्ता, अदिती पंत अशी कितीतरी महिला वैज्ञानिकांची नावे सांगता येतील. तरीही महिला संशोधकांची संख्या आजही तुलनेने कमीच आहे. सन १९५८ ते २०२३ या कालावधीत प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या शांतीस्वरूप भटनागर पुरस्काराने एकूण ५६४ पुरुषांना गौरवण्यात आले तर, महिलांची संख्या आहे केवळ १९. या वैज्ञानिकांनी संशोधन क्षेत्रात केलेल्या कामगिरीची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे. अनेक शोधनिबंध त्यांच्या नावावर प्रकाशित झाले आहेत आणि अनेक मानसन्मान त्यांना मिळाले आहेत, तरीही विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या मूठभर व्यक्ती सोडल्या, तर सामान्यजन या विभूतींच्या संशोधन कार्याशी परिचित नाहीत. त्या अर्थाने या 'काळोखातील लेकी' आहेत.
भारतीय महिला संशोधकांनी केलेल्या देदिप्यमान कामगिरीचा आढावा डॉ. तेजस्विनी देसाई यांनी अतिशय प्रभावीपणे घेतला आहे. संधी मिळाली तर महिला उत्तुंग कामगिरी करू शकतात, हे त्यांनी या पुस्तकातून दाखवून दिले आहे.
लेखक: तेजस्विनी देसाई
