Akshardhara Book Gallery
Ahmednagarchi Nizamshahi (अहमदनगरची निजामशाही)
Ahmednagarchi Nizamshahi (अहमदनगरची निजामशाही)
Share
Couldn't load pickup availability
Author: Burhan - A - Maasir
Publisher: Krishna Publications
Pages: 398
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Dr. B. G. Kunte
अहमदनगरची निजामशाही
बहमनी राजवटीचा अस्त झाल्यावर त्यातून ज्या पाच राजवटी दक्खनमध्ये उदयाला आल्या. त्यातील एक भक्कम राजवट म्हणजे निजामशाही ! इसवी सन १४९० रोजी मलिक अहमद म्हणजेच निजाम-उल-मुल्काने झालेल्या युद्धात बहमनी सैन्याविरुद्ध संपूर्ण विजय मिळवला. विजय मिळवून देणारा प्रदेश म्हणून त्याने आपल्या राज्याची राजधानी या नव्या ठिकाणी हलवली आणि शहराचे अहमदनगर असे नामकरण केले. पुढे प्रत्येक राजाने स्वतःला निजामशाह हा किताब लावला, तर त्यांच्या साम्राज्याला निजामशाही म्हटले गेले म्हणूनच ही राजवट पुढे अहमदनगरची निजामशाही म्हणून इतिहासात प्रसिद्ध पावली. मलिक अहमद निजामशाह याने या शहराच्या ठिकाणी एका भुईकोट किल्ल्याची पायाभरणी केली आहे. त्यानुसार अहमदनगरमध्ये अंडाकृती किल्ला बांधला. अहमदनगरच्या निजामशाहीत एकूण ११ निजाम होऊन गेले आहेत. त्यांनी ही राजवट जवळपास १४० वर्षे अहमदनगर येथून राज्य करून चालविली. अहमदनगरच्या निजामशाहीत मलिक अंबरसारखा शूर आणि धोरणी प्रधान होऊन गेला. त्याने जमीन महसूल व्यवस्था सुधारली. शिवाय शत्रूशी लढण्याकरिता गनिमी काव्याच्या युद्धनीतीचा अवलंब केला म्हणून त्याला गनिमी कावा युद्धनीतीचा जनक म्हटले जाते. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला पोषक ठरणारी पार्श्वभूमी याच निजामशाहीने दिली. कारण, वेरूळच्या भोसले घराण्यातील मूळ पुरुष बाबाजी भोसलेंपासून आजोबा मालोजीराजे, वडील शहाजी भोसलेंसह सर्व भाऊबंद याच निजामशाहीत पुढे आले. एवढेच नाही, तर मालोजीराजे यांनी इंदापूर या ठिकाणी, तर चुलते शरीफजी यांनी भातोडी (नगरजवळील) या ठिकाणी झालेल्या युद्धात निजामासाठी प्राणार्पण केले. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे घडले तेच मुळी निजामशाहीत होत. निजामशाहीची देणगी म्हणजे हुसेन निजामशाहच्या काळात चिकबुरूज नावाने जगातील भव्य असणारी तोफ. ५५ टन वजनाची ही तोफ बरेच दिवस परंड्याच्या किल्ल्यात होती. पुढे परंडा आदिलशाहकडे आल्यानंतर ऑगस्ट १६३२ साली ती विजापूरला गेली. शेवटचा निजामशाह मुर्तुजा (तिसरा) हा मुघलांच्या कैदेत गेला आणि १६३६ साली हे निजामशाही साम्राज्य बुडाले, तेव्हापासून १७५९पर्यंत अहमदनगर मुघलांच्या ताब्यात होते. अहमदनगर शहराची ऐतिहासिक आणि सामाजिक जडणघडण करण्यात निजामशाहीचा प्रचंड मोठा वाटा आहे. किंबहुना, निजामशाहीचा उल्लेख केल्याशिवाय अहमदनगर या शहराचा इतिहास लिहिलाच जाऊ शकत नाही, असे म्हटल्यास त्यात अजिबात वावगे नाहीये.
मूळ लेखक. बुरहान - ए - मआसिर
अनुवादित लेखक. डॉ. भ. ग. कुंटे
प्रकाशक. कृष्णा पब्लिकेशन्स
