Akshardhara Book Gallery
Ajun Nahi Jagi Radha (अजून नाही जागी राधा)
Ajun Nahi Jagi Radha (अजून नाही जागी राधा)
Share
Couldn't load pickup availability
Author: Snehalata Joshi
Publisher: Mehta Publishing House
Pages: 146
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
अजून नाही जागी राधा
'प्रथम आपण एकमेकांना अनुरूप आहोत, असं वरवर वाटतं दादा. आजच्या जमान्यात प्रत्येकजण प्रचंड इंडिव्हिज्युअलिस्टिक झालाय. एकदम लग्नबंधनात अडकण्याची रिस्कच वाटते. स्पेस जपणं, आपली आणि पार्टनरचीही; तरीही एकमेकांसाठी खूप काही करणं, खूप प्रेम करणं, तरीही एकमेकांवर स्वतःला न लादणं, नव्या नात्याचं प्रथम आकर्षण ओसरल्यावरही नात्यातले धागे मजबूत राहतात की नाही ते अजमावणं. थोडक्यात, भावी संसाराची इंटर्नशिपच म्हणा ना!' दादांना जरा गंमतच वाटली, 'पण बाळा, हे तुझं-तुझं, माझं माझं सांभाळून दोघांमधलं नातं कसं जपता येतं?' 'येतं ना! अॅडजस्टमेंट तर कोणत्याही दोन माणसांच्या एकमेकांजवळ राहण्यात गृहीत असतेच; पण कुणा एकाचाच हट्टीपणा, इगो किंवा अगदी टोकाची विरुद्ध आवड-निवड हे सहन केलं जात नाही.' अलीकडच्या 'लिव्ह इन रिलेशन'बद्दल अशी साधकबाधक आणि गंभीरपणे भाष्य करणारी 'मैत्रीण' ही कथा. अशाच काही आशयपूर्ण, विविधरंगी आणि लक्षवेधक कथांनी हा संग्रह सजला आहे.
लेखक : स्नेहलता जोशी
प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस
