Akshardhara Book Gallery
Akherache Parv (अखेरचे पर्व)
Akherache Parv (अखेरचे पर्व)
Share
Couldn't load pickup availability
Author: Vijaya Rajadhyaksh
Publisher: Mehta Publishing House
Pages: 178
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
अखेरचे पर्व
पंडित ऐकत होते. ऐकत असताना त्यांच्या स्वतःच्या आयुष्याचा पट त्यांच्या डोळ्यांसमोरून जात होता. त्या आयुष्याने काय दिले? क्षणिक आनंद मिळालाही असेल; पण शारदाच्या मनात आहे तसा स्थिर आनंद, तृप्ती ? शारदा म्हणाली तेच खरं. दोन मार्ग असतात- एक स्वतःला उधळण्याचा आणि दुसरा स्वतःला रुजवण्याचा, राखण्याचा. त्या वेळी तो दुसरा मार्ग दिसलाच नाही; दिसला असता तरी तो स्वीकारला गेला नसता. आज मात्र वाटते की, तो दुसरा मार्गच खरा! अजून रुजता येईल का? ते रुजलेपण केवढे सामर्थ्य देते ! ते सामर्थ्य जवळ होते म्हणूनच शारदा आपल्याला परत बोलावू शकली. आयुष्यातील खंत, हेवेदावे, कटुता यांच्या पलीकडे जाण्याची दिशा दाखवणारे सामर्थ्य आपल्याला कधी मिळेल का ? 'अखेरचे पर्व' हा ख्यातनाम लेखिका डॉ. विजया राजाध्यक्ष यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेला हा कथासंग्रह. विजयाबाई आपल्या आसपास घडणाऱ्या, अगदी साध्या वाटणाऱ्या घटना-प्रसंगांवर तसेच एखादी व्यक्ती किंवा त्यांना भेटलेली, भावलेली वेगळी माणसे (मग ती सामान्य का असेनात!) किंवा कोणताही शब्द (उदा. आभाळ, उद्ध्वस्त, खेळ, संयोग, अश्मा) असो; त्यावर सहज, ओघवत्या शैलीत वाचनीय कथा लिहितात. हे सर्व त्या कोणताही अभिनिवेश न बाळगता सहजपणे एखाद्या व्यक्तीला गोष्ट सांगावी इतक्या हळुवारपणे, प्रत्ययकारी पद्धतीने लिहितात. तरल वच संवेदनशील शैलीमुळे अशा कथा वैशिष्ट्यपूर्ण आणि वाचनीय ठरतात.
लेखक. विजया राजाध्यक्ष
प्रकाशक. मेहता पब्लिशिंग हाऊस
