Akshardhara Book Gallery
Akki (अक्की )
Akki (अक्की )
Share
Couldn't load pickup availability
Author: Santosh Paranjape
Publisher: Sakal Prakashan
Pages: 174
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:'---
अक्की
A Journey of will, son & click
जीवन हा एक संघर्ष आहे आणि तो प्रत्येकाच्या वाट्याला वेगवेगळ्या रूपात येतो, पण काही लढे असे असतात जे केवळ एका व्यक्तीचे नाही तर संपूर्ण कुटुंबाचे असतात. अक्षय परांजपे याची गोष्टही अशीच आहे. विल्सन नावाचा गंभीर आजाराचा त्याच्या आयुष्यावर आघात झाला. या आजाराने अक्षयचं बालपणच नव्हे; तर संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलून टाकलं. असं घडूनही अक्षय आणि त्याचे कुटुंब पाय रोवून विल्सनशी लढायला उभे ठाकले. या संघर्षातून अक्षयच नाही तर त्याचं कुटुंबही तावून सुलाखून बाहेर पडलं आणि फोटोग्राफीच्या माध्यमातून अक्षय स्वतःच्या पायावर उभा राहिला. विल्सन हा आजार, कर्णबधीरत्व, त्याच्या आईचा कॅन्सर या सगळ्या आघाड्यांवर लढताना आलेले अनुभव यासाठी वाचायलाच हवं असं हे पुस्तक आहे. अक्षयचे जिगरी दोस्त, सिनेविश्वातील सेलेब्रिटी - महेश मांजरेकर, सचिन पिळगांवकर, प्रवीण तरडे, संदीप पाठक, श्रीरंग देशमुख, गुरू ठाकूर, वैभव जोशी या सगळ्यांनीच अक्षयविषयी लिहिलेले त्यांचे अनुभव या पुस्तकाला रंजक करतात. "हल्ली अगदी लहानशा कारणाने किंवा किरकोळ आजाराने तरुण निराश होताना दिसतात. अशा काळात विल्सनसारख्या भयंकर आजाराला तोंड देणाऱ्या 'अक्की'कडून या संकटाला निडरपणे, बिनधास्तपणे कसे सामोरे जायचे आणि सकारात्मक आयुष्य कसे जगायचे हे शिकण्यासारखे आहे. 'अक्की'ची ही गोष्ट आपल्या सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहे."
-खासदार, मुरलीधर मोहोळ
प्रकाशक : सकाळ प्रकाशन

