Anandibai Peshwe (आनंदीबाई पेशवे )
Anandibai Peshwe (आनंदीबाई पेशवे )
Share
Author:
Publisher:
Pages: 194
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:'---
Anandibai Peshwe (आनंदीबाई पेशवे )
Author : Ujwala Sabanavi
आनंदीबाई पेशवे या, मळणचे श्री रघुनाथ महादेव ओक यांच्या कन्या होत्या.अतिशय लाडाकोडात वाढलेल्या आनंदीबाईंना कायम आपल्या माहेरचा, म्हणजे ओक घराण्याचा प्रचंड अभिमान होता. सुंदरते बरोबरच त्यांना बुद्धीमत्तेचं पण देणं लाभलं होतं. गणपतीवर त्यांची निस्सीम भक्ती होती. कुठल्याही परिस्थितीत ती श्रद्धा ढळली नाही. त्यांच्या जीवनात अनेक वादळे आली.भयंकर अशा संकटकाळी त्या या श्रद्धेमुळेच तगुन राह्यल्या. त्यांच्या आजींनी त्यांच्यावर उत्तम संस्कार केले असताना त्या इतके वाईट पद्धतीने कारस्थान करतील का हा खरोखरच प्रश्नच आहे. त्या स्वभावाने वाईट नव्हत्याच. परिस्थितीने त्यांना वाईट वागायला भाग पाडलं असावं. एक स्त्री म्हणुन जर आपण त्यांच्या कडे बघितले तर त्यांच्या वागण्याचे थोडी फार उत्तरे आपल्याला सापडतात. पती अतिशय पराक्रमी असुनही त्यांना पाहिजे तसा मान मिळत नव्हता. पर्यायाने त्यांची पत्नी असलेल्या आनंदीबाईंनाही मिळत नव्हता. त्यामुळे त्या जिद्दीला पेटत गेल्या. रघुनाथ रावांच्या लहरी स्वभावाने पण त्या रंजीस आल्या होत्या. कसंही करून आपण पेशवे पद मिळवायचच हे त्यांनी मनाशी पक्के ठरवले होते. दुर्दैवाने त्या जे ठरवत गेल्या त्याच्या विरुद्धच होत गेलं. रघुनाथरावांची त्यांना म्हणावी तेवढी साथ मिळाली नाही. रघुनाथरावांनी अनेक चुकीचे निर्णय घेतले. त्यामुळे त्यांच्या पुर्ण परिवाराला त्याचे परिणाम भोगावे लागले. उत्तरार्धात वणवण नशीबी आली. तरीही आनंदीबाई कोलमडल्या नाहीत. मोठ्या धेर्याने त्या शेवट पर्यंत झुंजत राह्यल्या. परिस्थितीशी दोन हात करत राह्यल्या. आपलं मनोबल कधीच खचू दिलं नाही. त्यांनी युद्ध सुद्धा केलं. प्रत्यक्षात रणांगणात न उतरता किल्ला लढवला. पण शेवटी त्या एक स्त्री होत्या. कुठेतरी त्यांना एक मर्यादा होती. बारभाई कारस्थानाचे त्यांच्या आयुष्यावर खुप दुरगामी परिणाम झाले. तरी त्या शेवट पर्यंत आपला आब राखून जगल्या. मोठ्या सरदाराची मुलगी, मोठ्या घराण्याची सुन, हे सगळं मिळालं होतं. पण नियतीला ते मान्य नव्हतं. त्यांच्या नशीबी परवडच होती. पण नियतीचा हा खेळ त्या धडाडीने खेळल्या. शेवट पर्यंत चांगलं जीवन वाट्याला यावं म्हणून झटत राह्यल्या. एखादी लवलवत वीज जशी लखलखत राहते तशा चमकत राह्यल्या.
It Is Published By : Varada Prakashan