Akshardhara Book Gallery
Angals Aani Aadhunik Nisarga Vidnyan (एंगल्स आणि आधुनिक निसर्ग विज्ञान)
Angals Aani Aadhunik Nisarga Vidnyan (एंगल्स आणि आधुनिक निसर्ग विज्ञान)
Share
Couldn't load pickup availability
Author: Anil Rajimwale
Publisher: Tejaswini Desai
Pages:
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Angals Aani Aadhunik Nisarga Vidnyan (एंगल्स आणि आधुनिक निसर्ग विज्ञान)
कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंगल्स या दोघांनी निसर्गाचे वस्तुनिष्ठ स्वरूप मांडले. त्यांच्या कामाची विभागणी झाली होती. मार्क्सने सामाजिक, आर्थिक आणि राजकीय बाबींवर लक्ष केंद्रित करायचे, तर एंगल्सने निसर्ग विज्ञान, लष्कराचे प्रश्न, तत्त्वज्ञान इत्यादींचा अभ्यास करायचा. अर्थातच ते दोघे एकमेकांना सहाय्य करत असत. त्यांचे कोणतेही लेखन पूर्णपणे कोणी एकट्याने केलेले नाही.
फ्रेडरिक एंगल्सने विज्ञानातील तत्कालीन अद्ययावत घडामोडींचा विस्तृत अभ्यास केला. त्याने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, खगोलशास्त्र असे विविध विषय सखोल अभ्यासले. इतिहासात प्रथमच एंगल्सने निसर्ग विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांच्यातील घनिष्ठ संबंध व परस्परावलंबन व्यापक पातळीवर ठामपणे प्रस्थापित केले.
अनिल राजिमवाले यांनी या पुस्तिकेत अतिशय रोचक पद्धतीने एंगल्स आणि त्याची शोधयात्रा कथन केली आहे. तेजस्विनी देसाई यांनी ती ओघवत्या भाषेत मराठीत आणली आहे. ही पुस्तिका मराठी वाचकांसाठी बहुमूल्य ऐवज ठरावा.
लेखक: अनिल राजिमवाले
अनुवादक: तेजस्विनी देसाई
