Akshardhara Book Gallery
Antrikshatil Jyoti (अंतरिक्षातील ज्योती)
Antrikshatil Jyoti (अंतरिक्षातील ज्योती)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dhruv Bhatt
Publisher: Mehta Publishing House
Pages: 131
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Sushma Shaligram
'अंतरिक्षना आगिया' या गुजराती पुस्तकाचा अनुवाद
अंतरिक्षातील ज्योती
पूर्णचंद्राचे दर्शन घडवणारी पौर्णिमेची शीतल धवल रात्र वा गडद काळोखात चमचमणाऱ्या नक्षत्र-तारकांची रम्य जाणीव करून देणारी रजनी किंवा सर्वव्यापी अंतरिक्षातील नक्षत्रांच्या वर्षभर सतत बदलणाऱ्या स्थानांनुसार बदलत्या ऋतूंची नकळतच माहिती पुरवणारी निशा...
पृथ्वीतलावरील अवघी सजीव सृष्टी या साऱ्याचा सहज अनुभव घेत असते. त्या सामान्य जाणिवेच्या पलीकडे जाऊन, आवड, कुतूहल, निरीक्षण, अभ्यास, संशोधन असे टप्पे ओलांडत एखादा सर्जनशील प्रतिभावान लेखक वाचकांच्या हाती काय देऊ शकतो याचे 'अंतरिक्षातील ज्योती' हे उत्तम उदाहरण आहे.
सर्वसाधारणतः उपलब्ध असलेली माहिती, खगोलशास्त्रीय घटना, वैशिष्ट्यपूर्ण भारतीय कालगणना, पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या सत्तावीस नक्षत्रांच्या पुराणकथा आणि त्यांना समांतर अशा ग्रीक पुराणातील परिचित अपरिचित कथा यांची विलक्षण सुबक गुंफण या पुस्तकात दिसून येते.
आकाशाचे दर्शन घडविणारे नकाशे तसेच विविध चित्रे यांमुळे पुस्तक अधिक आकर्षक झाले आहे. हे पुस्तक वाचल्यावर अंतरिक्षात चमचमणाऱ्या नक्षत्रांच्या या कथांशी अपरिचित असणाऱ्यांचे कुतूहल वाढेल, त्यांच्याशी तोंडओळख असणाऱ्यांना त्या नक्षत्रांचा जवळून परिचय घडेल आणि अभ्यासूंना अंतरिक्षातील ही नक्षत्र-लेणी अधिकच आपली, अधिकच जवळची वाटतील.
आपल्या प्रत्येक पुस्तकाद्वारे वाचकांना वेगवेगळ्या विश्वात घेऊन जाणारे लेखक श्री. ध्रुव भट्टसुद्धा मराठी वाचकांना या पुस्तकामुळे अधिक जवळचे वाटतील यात शंका नाही.
लेखक : ध्रुव भट्ट
अनुवाद : सुषमा शाळिग्राम
प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस
