Akshardhara Book Gallery
Anuradha Patil Yanchi Kavita (अनुराधा पाटील यांची कविता)
Anuradha Patil Yanchi Kavita (अनुराधा पाटील यांची कविता)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr. Dada Gore
Publisher: Sanskruti Prakashan
Pages: 272
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:---
अनुराधा पाटील यांची कविता
१९८१ ते २००५ या २४ वर्षांत अनुराधा पाटील यांच्या चार कवितासंग्रहात एकूण २२४ कविता प्रकाशित झाल्या आहेत. सुटे सुटे कवितासंग्रह वाचताना लक्षात येणाऱ्या अनुराधा पाटील आणि चारही कवितासंग्रह वाचताना लक्षात येणाऱ्या अनुराधा पाटील सतत काव्यदृष्ट्या विकसित झालेल्या दिसतात. अनुराधा पाटलांची कविता त्यांची आणि त्यांचीच कविता आहे. त्यांच्या कवितांचा वेगळा पिंड आहे. 'दिगंत'मध्ये त्या थोड्या चाचपडत असल्या तरी हे चाचपडणे अपरिहार्य असून पुढील कवितासंग्रहात मात्र त्यांची कविता स्वतःच्या वेगळ्या अनुभूतीतून साकार झाली आहे. वाढत्या वयाबरोबर, अनुभवाबरोबर त्यांची जीवनाकडे आणि कवितेकडे बघण्याची जाणीव अधिकाधिक विकसित आणि परिपक्व झालेली दिसते. त्यातूनच स्वतःचा आणि स्त्रीत्वाचा आदिम शोध घेत घेत अनुराधा पाटलांची कविता स्वतःचा एक आगळावेगळा तोंडवळा एक व्यक्तिमत्त्व घेऊन उभी राहिल्याचे दिसते.
