Akshardhara Book Gallery
APAL VILAKSHAN SHAREER (आपलं विलक्षण शरीर)
APAL VILAKSHAN SHAREER (आपलं विलक्षण शरीर)
Couldn't load pickup availability
Author: ANIL AVACHAT
Share
Publisher: SAMKALIN PRAKASHAN
Pages: 51
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
APAL VILAKSHAN SHAREER (आपलं विलक्षण शरीर)
आपलं शरीर विलक्षण आहे. एखाद्या जादुगारासारखं. मेंदू, हृदय, यकृत, फुफ्फुस, स्वादुपिंड, शरीरात सगळीकडे खेळणारं रक्त इथपासून ते नाक, कान, डोळे, त्वचा या अवयवांमध्ये लाखो गुंतागुंतीच्या यंत्रणा सुरळीत सुरू असतात. त्यातली एखादी छोटीशी यंत्रणा बिघडली की आपण आजारी पडतो. शरीर नावाचं हे यंत्र नेमकं कसं चालतं ? लोण्याच्या गोळ्यासारखा मेंदू सगळं शरीर कसं नियंत्रित करतो? जराही विश्रांती न घेता फुफ्फुसं आणि हृदय दिवसरात्र कसं काम करतात ? रक्तवाहिन्यांची क्लोज्ड सिस्टीम कशी काम करते? या आणि अशा अनेक प्रश्नांची कोडी लेखक अनिल अवचटांना पडली आणि लागले की ते त्यांच्या मागे. त्या त्या विषयातले तज्ज्ञ गाठले, पुस्तकं पालथी घातली आणि ही कोडी सहजसोप्या भाषेत आपल्यासमोर उलगडून ठेवली.
लेखक: अनिल अवचट
