Akshardhara Book Gallery
Apale Antarmana (आपले अंतर्मन)
Apale Antarmana (आपले अंतर्मन)
Couldn't load pickup availability
Author: Dr. Gajanan Patil
Share
Publisher: Shabdalay Prakashan
Pages: 237
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली
आपले अंतर्मन
आपल्या आतला डॉक्टर आपणच शोधूया !
देहाच्या व्याधींवर मनाचे औषध देणारे, आपल्या आतल्या डॉक्टरला जागा करणारे आणि आरोग्याचा नवा प्रकाश देणारे हे पुस्तक म्हणजे विज्ञानाची मर्यादा जिथे संपते तिथून सुरू होणारी अंतर्मनाची एक अथांग गाथा आहे. एका डोळ्याची दृष्टी अचानक गेली असताना केवळ सकारात्मकतेच्या बळावर डोळ्यांत पुन्हा चैतन्याचे दीप लावणारे डॉ. गजानन पाटील यांचा हा प्रवास मानवी जिद्दीचे जिवंत प्रमाण आहे. आपल्या शरीराला जडणाऱ्या व्याधींचा उगम जर मनात असेल तर त्याचे उत्तरही त्याच मनात दडले आहे हे लेखकाने या ग्रंथातून सिद्ध केले आहे. मेंदूच्या सॉफ्टवेअरमधील नकारात्मकता पुसून आरोग्याचे नवीन रीप्रोग्रामिंग करणारी ही एक संजीवनीच आहे. न्यूरोप्लास्टिसिटी आणि सायकोन्यूरोइम्युनोलॉजी यांसारख्या कठीण वैज्ञानिक संकल्पना अगदी सोप्या मराठी भाषेत मांडतानाच व्हिजुअलायझेशन आणि कृतज्ञता डायरी यांसारख्या साधनांतून लेखकाने स्वतःला घडवण्याचा एक वेगळा मार्ग दाखवला आहे. औषधांच्या कडू गोळ्यांपेक्षा स्वतःच्या अंतर्मनावर विश्वास ठेवून स्वयं आरोग्याचा सोहळा साजरा करण्यासाठी हे पुस्तक प्रत्येक वाचकाच्या संग्रही असायलाच हवे. आता वेळ आली आहे आपल्या आतील डॉक्टराला जागृत करून मनाचा शरीराशी सुसंवाद करण्याची. कारण आरोग्याची ही गुरुकिल्ली हाती घेताच अनारोग्य पळून जाईल आणि एक निरामय आरोग्य मिळेल. कारण या पुस्तकाच्या माध्यमातून डॉ. गजानन पाटील यांनी तुमच्या आरोग्याचा पासवर्ड आता तुमच्याच अंतर्मनातून कसा बाहेर काढायचा हे दाखवून दिले आहे. चला तर मग आपल्या आतला डॉक्टर आपण शोधून निरामय आरोग्य जगूया !
लेखक : डॉ. गजानन पाटील
