Akshardhara Book Gallery
Arisht Angarak (अरिष्ट अंगारक)
Arisht Angarak (अरिष्ट अंगारक)
Share
Couldn't load pickup availability
Author: Narayan Dharap
Publisher: Manorama Prakashan
Pages: 215
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
अरिष्ट अंगारक
'आम्ही तिरडीवरून उठून आलेल्या एखाद्या प्रेतासारखे दिसतो..
त्याचा आवाज घोगरा. गुदमरल्यासारखा येत होता.
आणि हे चमत्कारिक शब्द उच्चारण्यापुरतं उघडलेलं तोंड त्याने
लगोलग एखाद्या सापळ्यासारखं घट्ट मिटून घेतलं.
त्या शब्दांनी प्रकाशाला जबरदस्त धक्का बसला. त्याच्या अगदी
मनातला विचार या माणसाने बोलून दाखविला होता! त्याच्या डोळ्यांनी
काही भास होत नव्हता ना ? कानावर आलेले शब्द खरे होते का ?
'डोळ्यांसमोर दिसणारा मरतुकडा माणूस खरा आहे. तुझ्या कानांना
काही भास झालेला नाही.' आम्ही तुझ्या मनातले विचारच बोलून दाखवत
आहोत.' पुन्हा तो घाणेरडा. गुदमरलेल्यासारखा आवाज आला..
लेखक : नारायण धारप
प्रकाशक : मनोरमा प्रकाशन
