Akshardhara Book Gallery
Artificial Intelligence By Tushar Kuthe (आर्टिफिशियल इंटेलिजन्स - मानव आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या सहअस्तित्वाचे कोडे)
Artificial Intelligence By Tushar Kuthe (आर्टिफिशियल इंटेलिजन्स - मानव आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या सहअस्तित्वाचे कोडे)
Share
Couldn't load pickup availability
Author: Tushar Kute
Publisher: Madhushree Publication
Pages: 368
Edition: Latest
Binding: paperback
Language:Marathi
Translator:
Artificial Intelligence By Tushar Kuthe (आर्टिफिशियल इंटेलिजन्स - मानव आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या सहअस्तित्वाचे कोडे)
हे पुस्तक आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे निर्माण होणाऱ्या गंभीर प्रश्नांचा विस्तृत ऊहापोह करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आपला प्रवास मानवतेच्या अंताकडे होतो आहे का, अशी साधार शंका लेखक या पुस्तकातून उपस्थित करतो.
मानवतेचा अंत याचा अर्थ केवळ पृथ्वीवरून मानवी प्रजातीचा विनाश होणे, असा नसून तो अधिक व्यापक आणि सूक्ष्म आहे. तो कदाचित आपल्या स्वातंत्र्याचा, आपल्या निर्णयक्षमतेचा, मानव म्हणून असलेल्या आपल्या अद्वितीय ओळखीचा, आपल्या अस्तित्वाच्या उद्देशाचाही अंत असू शकतो. हे पुस्तक या विविध शक्यतांचा, त्यांच्यामागील कारणांचा आणि त्यांच्या संभाव्य परिणामांचाही शोध घेण्याचा प्रयत्न करते.
या पुस्तकाचा उद्देश भीती निर्माण करणे, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रगतीला विरोध करणे हा नसून कृत्रिम बुद्धिमत्ता या अत्यंत महत्त्वाच्या आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या विषयाबद्दल समाजात एक सखोल, माहितीपूर्ण आणि चिकित्सक चर्चा सुरू व्हावी, हाच आहे.
Author :Tushar Kute
Publisher : Madhushree Publication