Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Atmakatha (आत्मकथा )

Atmakatha (आत्मकथा )

Regular price Rs.630.00
Regular price Rs.700.00 Sale price Rs.630.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Madhu Limaye

Publisher: Sadhana Prakashan

Pages: 594

Edition: Latest

Binding: Hardbound

Language:Marathi

Translator:---

आत्मकथा

1922 ते 1995 असे जवळपास 73 वर्षांचे आयुष्य मधु लिमये यांना लाभले. त्यांनी वयाच्या 16 व्या वर्षी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला आणि 1982 पर्यंत ते सक्रिय राजकारणात राहिले. 'चले जाव' चळवळ, 'गोवा मुक्ती संग्राम' आणि 'राष्ट्रीय आणीबाणी' या तिन्ही प्रसंगी त्यांनी तुरुंगवास भोगला. समाजवादी पक्षाचे नेते म्हणून ते तरुणपणापासून वावरले. महाराष्ट्रातच जडणघडण झालेली असूनही बिहारमधून चार वेळा लोकसभेवर निवडून गेले, उत्तम संसदपटू अशी त्यांची ख्याती राहिली. अखेरची 12 वर्षे त्यांनी राजकारणाचे भाष्यकार आणि लेखक या भूमिका पार पाडल्या. त्यांच्या नावावर लहान मोठी अशी चार डझन (हिंदी व इंग्रजी) पुस्तके आहेत. अशा या मधु लिमये यांनी वयाच्या पंचविशीपर्यंतचे म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाले तोपर्यंतचे लिहिलेले आत्मकथन म्हणजे हे पुस्तक आहे. यातून त्यांची बालकुमार वयातील व तारुण्यातील झंझावाती वाटचाल तर दिसतेच, पण स्वातंत्र्यपूर्व पाव शतकातील भारतीय समाजजीवनाची विहंगम दृश्येही पाहायला मिळतात. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर चार दशकांतील त्यांची तेजस्वी वाटचाल आणि भारताचे वादळी राजकारण समजून घेण्यासाठी हे पुस्तक पायाभूत ठरेल.

प्रकाशक : साधना प्रकाशन 

View full details