Akshardhara Book Gallery
Avachit Gavasleli Pustake (अवचित गवसलेली पुस्तके)
Avachit Gavasleli Pustake (अवचित गवसलेली पुस्तके)
Share
Couldn't load pickup availability
Author: Ashok Bendkhale
Publisher: Granthali
Pages: 175
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
अवचित गवसलेली पुस्तके
अशोक बेंडखळे यांच्या 'अवचित गवसलेली पुस्तके 'मुळे मला काही महत्त्वाच्या पुस्तकांची माहिती झाली. यातील काही पुस्तकं म्हणजे डॉ. सदा कन्हाडेंचं 'स्वातंत्र्यलढा आणि मराठी लेखक', नामवंत चित्रकार बाबुराव सडवेलकरांचं 'महाराष्ट्रातील कलावंत', डॉ. कृ. रा. सावंत यांचं 'पाश्चात्य रंगभूमी', 'अभिनय' या नाट्यघटकांबद्दल लिहिणारे ज्ञानेश्वर नाडकर्णी. मात्र या पुस्तकांतील लेख म्हणजे पारंपारिक अर्थाने पुस्तक परीक्षणं नाहीत. अशोक बेंडखळे यांच्या लेखांत पुस्तकांबद्दल पूरक माहिती असते. हे वाचताना लक्षात येते की अशोक बेंडखळे यांना पुस्तकांइतकेच ग्रंथसंस्कृती, वाचनसंस्कृतीबद्दल प्रेम आहे. समाजात जसे विविध ग्रंथ सतत प्रकाशित होत राहिले पाहिजेत, त्याचप्रमाणे अशा पुस्तकांची दखल घेणारे, त्याकडे वाचकांचे लक्ष वेधून घेणारे, अशा पुस्तकांचा परिचय करून देणारे लेखनसुद्धा गरजेचे असते. अशोक बेंडखळेंचं हे पुस्तक ही गरज भागवते. आजच्या इंटरनेट आणि मोबाईलच्या काळात पुस्तकांबद्दल थोडक्यात पण वाचनीय माहिती देणाऱ्या लेखनाची नितांत गरज आहे.
लेखक. अशोक बेंडखळे
प्रकाशक. ग्रंथाली
