Akshardhara Book Gallery
Azim Premiji (अझीम प्रेमजी)
Azim Premiji (अझीम प्रेमजी)
Share
Couldn't load pickup availability
Author: Sandeep Khanna / Varun Sud
Publisher: Krishna Publications
Pages: 215
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Meena Shete - Sambhu
अझीम प्रेमजी
अझीम प्रेमजी ही भारताला मिळालेली केवढी विलक्षण देणगी आहे! व्यवसाय प्रामाणिकपणे चालवता येतो हे प्रेमजींचं आयुष्य आपल्याला का शिकवून जातं याविषयी हे पुस्तक आपल्याला सांगतं. निग्रहीपणा, प्रचंड ऊर्जा, काटकसर आणि आत्मनियंत्रण यामुळे फक्त संपत्तीची निर्मितीच होत नाही, तर चारित्र्याची निर्मितीही होते. परोपकारी काम करणं ही गोष्ट फक्त आत्म्यासाठीच चांगली नाही, तर ती भांडवलीकरणालाही अधिकृतता प्राप्त करून देते. वाचण्यासाठीचं खूपच विलक्षण पुस्तक!" ----गुरचरण दास, लेखक "
अझीम प्रेमजी हे फक्त एक नाव नाही. त्याच्यातून द्रष्टेपणा, एक प्रवास, चिकाटीची साहसकथा आणि अढळ निर्धार व्यक्त होतो. या नावातून परोपकारीपणाची पुनर्व्याख्या केली जाते आणि विश्वस्तपणाचं चैतन्य सूचित होतं. अझीम प्रेमजी हे नाव समाजाच्या कल्याणाच्या आणि सामाजिक कायापालटाच्या कृतींना दिशा देणाऱ्या मूल्यांचं प्रतिनिधित्व करतं. या पुस्तकातून या सगळ्याचं मोठं सौंदर्यपूर्ण दर्शन घडतं. उच्च स्तरीय व्यावसायिक नेतृत्व, निगर्वी विनयशीलता आणि अजेय, शांततामय साधेपणा व खासगीपणा जपणारं जीवन यांचं सहअस्तित्व पाहण्याची इच्छा असलेल्या सर्वांनी वाचलंच पाहिजे असं पुस्तक." - डॉ. देवी शेट्टी, नारायण हेल्थचे अध्यक्ष
मूळ लेखक. संदीप खन्ना / वरूण सूद
अनुवादित लेखक. मीना शेटे - संभू
प्रकाशक. कृष्णा पब्लिकेशन्स
