Akshardhara Book Gallery
Badalatya Punyachi Badalati Hirvai (बदलत्या पुण्याची बदलती हिरवाई)
Badalatya Punyachi Badalati Hirvai (बदलत्या पुण्याची बदलती हिरवाई)
Share
Couldn't load pickup availability
Author: VINAYA GHATE
Publisher: MERVEN TECHNOLOGIES
Pages: 179
Edition: latest
Binding: paperback
Language:Marathi
Translator:'---
बदलत्या पुण्याची बदलती हिरवाई
आटपाट नगर होतं विद्येचं माहेरघर होतं सह्याद्रीच्या कुशीत होतं टेकड्यांच्या मुशीत होतं मुळा-मुठा निर्मळ होती गोड पाण्याची चंगळ होती काळ्या मातीत कस होता वरण भात बरस होता निसर्गाचं देणं होतं पाताळेश्वरी लेणं होतं नाव त्याच पूर्ण होतं खरंच काही उणं नव्हतं
पण परंतु किन्तु....
औद्योगिक क्रांती झाली पुण्यामध्ये पिंपरी आली कारखाने धूर ओकू लागले पुणेकर सारखे खोकू लागले पुण्याची आय-टी पंढरी झाली तज्ञांची मांदियाळी आली उंच इमारतींचे पीक आले शेती करणे अहित झाले टेकड्यांवर हातोडा पडला सह्यादीच तेवढा कळवळला मुळा-मुठा सुकून गेली सांडपाण्याने बहरुन आली रस्ता गाड्यांमध्ये हरवत गेला चालताना श्वास कोंडत गेला युज अँड थ्रो प्रतिष्ठेचे झाले जागोजागी ढीग कचऱ्याचे आले एकेकाळची पुण्यनगरी होतेयं आता सिमेंटनगरी
प्रा. माधव सावळे यांच्या पुण्याची कहाणी कालची अन् आजची या कवितेत बदलत्या पुण्याचे चित्र रेखाटले आहे. त्यातील या काही महत्त्वपूर्ण ओळी. कवितेत पुण्यनगरीतील बदल किती समर्पकपणे मांडले आहेत. हे बदल होताना निसर्गरम्य पुण्याच्या हिरवाईतही मोठ्या प्रमाणात बदल झाले. झालेले बदल, टिकलेले हिरवे वारस आणि चोखंदळ पुणेकरांनी नव्याने आणि जाणीवपूर्वक जोपासलेली वनस्पतीसंपदा विषद करणारे 'बदलत्या पुण्याची बदलती हिरवाई' हे पुस्तक निसर्गप्रेमींच्या पसंतीस उतरेल याची खात्री वाटते.
लेखक : डॉ विनया घाटे
प्रकाशन : मरवेन टेकनॉलॉजि
