Akshardhara Book Gallery
Bahurupi (बहुरूपी)
Bahurupi (बहुरूपी)
Share
Couldn't load pickup availability
Author: Chintaman Ganesh Kolhatkar
Publisher: Popular Prakashan Pvt Ltd
Pages: 586
Edition: Latest
Binding: Hardcover
Language:Marathi
Translator:
Bahurupi (बहुरूपी)
कै. चिंतामणराव कोल्हटकरांसारख्या एका कसलेल्या नटाच्या, श्रेष्ठ दिग्दर्शकाच्या व अनुभववृद्ध नाट्यव्यावसायिकाच्या या आत्मकथेने मराठीतील आत्मचरित्रपर वाङ्मयात फार वरचे स्थान मिळवले आहे. चिंतामणरावांच्या पीळदार, तीव्र व प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाबरोबरच मराठी रंगभूमी, नाट्यकला व नाट्यवाङ्मय आणि या माध्यमांच्या साह्याने व्यक्त झालेली कसदार मराठी प्रतिमा यांचे जे विलक्षण दर्शन 'बहुरूपी'ने घडवले, त्याने अवघा मराठी वाचक थरारून गेला. सर्वसाधारण वाचकाने मोठ्या उत्साहाने विकत घेऊन या पुस्तकाची आपली आवड व्यक्त केली, तर चोखंदळ टीकाकारांनी कधी नव्हे ते एकमुखाने त्याच्या वाङ्मयीन गुणांची प्रशंसा केली. भारत सरकारची साहित्य अकादेमी व मुंबई सरकार यांनी श्रेष्ठ मराठी ग्रंथासाठी ठेवलेली वार्षिक पारितोषिके देऊन या ग्रंथाचा जो गौरव केला, त्यात वाचकांची आवड व टीकाकारांची प्रशंसा प्रातिनिधिक रीतीने व्यक्त झाली, असे म्हणायला हरकत नाही. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीने प्रसिद्ध केलेल्या 'दि न्यू ब्राह्मन्स' या पुस्तकात 'बहुरूपी'तील काही भाग भाषांतर करवून घेऊन समाविष्ट केला आहे. चिंतामणरावांनी आयुष्याच्या अखेरीस वठवलेली (पण पूर्वपरिचयाची) लेखकाची भूमिका त्यांच्या इतर भूमिकांप्रमाणे अत्यंत यशस्वी झाली व मान्यता पावली.
लेखक: चिंतामण गणेश कोल्हटकर
