Akshardhara Book Gallery
Betavarche Te Dogha By Samar (बेटावरचे ते दोघ )
Betavarche Te Dogha By Samar (बेटावरचे ते दोघ )
Share
Couldn't load pickup availability
Author: Samar
Publisher: Samar Publication
Pages: 151
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Betavarche Te Dogha By Samar (बेटावरचे ते दोघ )
दोन वेगळ्या कथा… दोन वेगळ्या अनुभूती… 1. ‘बेटावरचे ते दोघं’ (Fantasy Fiction) : आपण एका निर्जन बेटावर आलो आहोत, असं एका तरुण आणि तरुणीला समजतं. ते अदल्या दिवशी रात्रीपर्यंत त्यांच्या घरातच असतात. सकाळी त्यांचे डोळे उघडतात, ते त्या निर्जन बेटावरच. तिथे ना प्राणी असतो, ना मानवी अस्तित्वाची एकही खूण. तिथून बाहेर पडण्याचा अघोरी मार्ग त्यांना समजतो, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. एकमेकांना न ओळखणाऱ्या आणि आपापल्या आयुष्यात वैवाहिक जीवनाच्या उंबरठ्यावर उभ्या असणाऱ्या त्या दोघांना तो मार्ग सर्वथा अस्वीकार्ह असतो. 2. ‘स्मृतीविप्लव’ (Science Fiction) : इ.स.2150… ‘बैतीस्तान’ या देशात ‘विस्लोहत’ ही मूलतत्त्ववादी संघटना आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे युवक आणि युवतींची स्मृती नष्ट करून त्यांच्या मनात दहशतवादी विचार रुजवण्याचं काम करत असते. त्या संघटनेतील दहशतवादी ‘लीना’ नावाच्या युवतीचं अपहरण करतात आणि तिला एका बंकरमध्ये नेतात. तिथल्या एका तरुण दहशतवाद्याच्या मनात लीनाबाबत प्रेम निर्माण होतं आणि तिच्याशी बोलल्यावर त्याच्या मनात दहशतवादाविषयी काही प्रश्नही निर्माण होतात. लीनावर स्मृती नष्ट करण्याचा प्रयोग होऊ नये, असं त्याला वाटतं; मात्र तो काहीही करू शकत नाही.
Author : Samar
Publisher : Samar Publication
