Akshardhara Book Gallery
BHAGAT SINGH (भगतसिंग)
BHAGAT SINGH (भगतसिंग)
Share
Couldn't load pickup availability
Author: संपादित
Publisher: National Book Trust
Pages: 152
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Rameshchandra Patakar
BHAGAT SINGH (भगतसिंग)
निवडक भाषणे व लेखन
भगतसिंग हे थोर देशभक्त आणि क्रांतिकारक समाजवादी होते. पण त्याचबरोबर भारतातील सुरूवातीच्या काळातील ते एक मार्क्सवादी विचारवंत आणि विचारसरणी- चिंतक (ideologue) होते. अगदी लहानपणापासून त्यांना वाचनाने झपाटून टाकले होते. त्यांच्या बहुआयामी वाचनाचा त्यांच्या विचारावर व लेखनावर प्रभाव पडला आहे. भगतसिंग यांनी न्यायालयात केलेली कित्येक निवेदने, त्यांनी आपल्या वडिलांना व कॉम्रेड्सना उत्कटतेने लिहिलेली पत्रे, क्रांती व जातीयवादाविषयीची त्यांची मर्मदृष्टी आणि नास्तिकतेवरील त्यांचा अढळ विश्वास या सर्वांतून एकाच वेळी स्वतंत्रपणे विचार करणाऱ्या व पूर्णपणे विकसित झालेल्या मनाचा प्रत्यय येतो. भगतसिंग यांचे लेखन विविधांगी आहे. त्यांच्या जन्मशताब्दीच्या खास प्रसंगी आणि त्यांच्या हौतात्म्याला झालेल्या पंचाहत्तराव्या वर्षाचे स्मरण करताना त्यांची भाषणे, लेखन व पत्रे यांचा निवडक लेखसंग्रह वाचकांच्या हाती देताना नॅशनल बुक ट्रस्ट, इंडियाला अभिमान वाटतो.
संकलक: डी.एन.गुप्ता
अनुवाद: रमेशचंद्र पाटकर
प्रकाशक: नॅशनल बुक ट्रस्ट,इंडिया
