Akshardhara Book Gallery
Bharat Aani Samyawad (भारत आणि साम्यवाद)
Bharat Aani Samyawad (भारत आणि साम्यवाद)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr. B. R. Ambedkar
Publisher: Shabda Publication
Pages: 150
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Vasanti Phadke
भारत आणि साम्यवाद
१९५०च्या सुरुवातीला, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'इंडिया अँड कम्युनिझम' या पुस्तकाची आखणी व लेखन सुरू केले होते, परंतु ते पुस्तक पूर्ण होऊ शकले नाही. या पुस्तकातील काही भाग आणि 'कॅन आय बी अ हिंदू ?' या त्यांच्या दुसऱ्या एका अपूर्ण पुस्तकातील एक भाग प्रस्तुत पुस्तकात समाविष्ट केला आहे. आनंद तेलतुंबडे यांनी या पुस्तकाला अभ्यासपूर्ण आणि विवेचक प्रस्तावना लिहिली आहे. आंबेडकरांची साम्यवाद आणि मार्क्सवाद या विचारसरणींसंबंधीची मते, आंबेडकर आणि कम्युनिस्ट यांच्यातील मतभेदांची ऐतिहासिक कारणे, त्यांच्या विचाराची दिशा इत्यादी विषयांचा सविस्तर उहापोह त्यांनी केला आहे. आंबेडकरवादी आणि कम्युनिस्ट यांच्यात कोणकोणत्या मुद्द्यांवर मतैक्य असू शकते याचे त्यांनी चिकित्सक विश्लेषण केले आहे. भारतातील वंचितांच्या, शोषितांच्या मुक्ततेसाठी असे मतैक्य ही एक आवश्यक पूर्वअट आहे, असे त्यांचे मत आहे. प्रस्तुत पुस्तकाचे वाचन दोन्ही विचारधारांच्या अनुयायांसाठी डोळे उघडणारे असून, सामाजिक प्रश्नांविषयी आस्था असणाऱ्या सर्वांसाठीच ते अनिवार्य ठरावे असे आहे.
लेखक. बी आर आंबेडकर
अनुवादित लेखक. वासंती फडके
प्रकाशक. शब्द पब्लिकेशन
