Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Bhartiy Swatantya Chalvalicha Arthik Pariprekshyatun Abhyas (1757-1947) (भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा आर्थिक परिप्रेक्ष्यातून अभ्यास (१७५७-१९४७))

Bhartiy Swatantya Chalvalicha Arthik Pariprekshyatun Abhyas (1757-1947) (भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा आर्थिक परिप्रेक्ष्यातून अभ्यास (१७५७-१९४७))

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: संपादित

Publisher: Sanay Prakashan

Pages: 320

Edition: Latest

Binding: Hardcover

Language:Marathi

Translator:

Bhartiy Swatantya Chalvalicha Arthik Pariprekshyatun Abhyas (1757-1947) (भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा आर्थिक परिप्रेक्ष्यातून अभ्यास (१७५७-१९४७))

आधुनिक भारताचा इतिहास आपण अनेकदा राजकीय अंगाने पाहतो. मात्र भारतीय राष्ट्रीय चळवळ विकसित होत गेली, ती आर्थिक संदर्भातूनसुद्धा, कारण इथल्या ब्रिटिश राजवटीचा थेट संबंध इंग्लंडच्या आर्थिक धोरणांशी व भारताच्या आर्थिक शोषणाशी होता. भारत इंग्लंडची आर्थिक वसाहत होती. वसाहतवादी अर्थव्यवस्थेची वाणिज्यवादी अवस्था (इ. स. १७५७-१८१३), खुल्या व्यापाराची अवस्था (इ. स. १८१३-१८५७) आणि वित्तीय साम्राज्यवादी अवस्था (इ. स. १८५८-१९४७) या टप्प्यांमधून जे स्थित्यंतर होत गेले, तसतसे भारताचे आर्थिक शोषण वाढत गेले आणि भारतातील असंतोषही वाढत गेला. एकोणिसावे शतक भारताच्या इतिहासातील एक वैशिष्ट्यपूर्ण टप्पा आहे. हे शतक म्हणजे भारतीय नवजागरणाचा, सामाजिक-धार्मिक सुधारणा चळवळींचा, आर्थिक विचारांचा, राष्ट्रवादाचा, स्वातंत्र्य आंदोलनाचा व आधुनिकतेचा आरंभकाल होता. या सर्वांना साकल्याने 'भारतीय प्रबोधन' म्हणता येईल. या प्रबोधनातूनच पुढे विसाव्या शतकात भारतात स्वातंत्र्य आंदोलन आकारास आले. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचा पाया जसा येथील सामाजिक-धार्मिक सुधारणा चळवळींनी घातला, तसा तो एकोणिसाव्या शतकात अनेक सामाजिक विचारवंतांनी मांडलेल्या आर्थिक विचारांनी अधिकच मजबूत केला.

संपादक: डॉ.उत्तम पठारे , डॉ. लहू गायकवाड 

View full details