Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Bhartiya Naastikvad (भारतीय नास्तिकवाद)

Bhartiya Naastikvad (भारतीय नास्तिकवाद)

Regular price Rs.320.00
Regular price Rs.400.00 Sale price Rs.320.00
20% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Deviprasad Chattopadhyay

Publisher: Sanay Prakashan

Pages: 336

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Sachin Waghmare

भारतीय नास्तिकवाद

“जर हे जग ईश्वराने बनविले आहे, तर मग त्यामध्ये कोणताही बदल किंवा विनाश, 
तसेच दुःख आणि संकटे नसावीत. योग्य आणि अयोग्य किंवा पवित्र-अपवित्र या गोष्टी 
त्यांच्याकडूनच आल्या पाहिजेत.”

“जर दुःख आणि आनंद, प्रेम आणि तिरस्कार या गोष्टी मनुष्यामध्ये भरण्याचे काम देव करतो, 
तर या गोष्टी त्याच्या स्वतःमध्येही असल्या पाहिजेत, आणि जर तसे असेल तर तो परिपूर्ण कसा?”

“जर देव हाच कर्ता आहे आणि सर्व काही त्यालाच समर्पित करायचे आहे तर मग सद्गुणांचा 
सराव करून उपयोग काय? सर्व काही त्यालाच द्यायचे आहे तर मग योग्य किंवा अयोग्य सारखेच 
होतील आणि सर्व कर्मे सारखीच होतील.'
"
“पण जर दुःख आणि वेदना या अन्य काही कारणांनी असतील, तर याचा अर्थ त्या ठिकाणी असे 
काही आहे, की ज्याला देव कारणीभूत नाही. मग जे काही अस्तित्वात आहे, त्यामागे कोणतेही 
कारण नसावे, असे म्हणता येईल.

“पुन्हा एकदा, देव हाच निर्माता आहे, तर तो कोणत्याही कारणांनी किंवा विनाकारण कृती करतो. 
जर तो काही कारणांनी कृती करत असेल तर तो परिपूर्ण नाही असे म्हणावे लागेल. कारण इच्छा 
पूर्ण करण्यासाठी त्याने समाधानकारक कृती केली पाहिजे. जर तो विनाकारण कृती करत असेल 
तर तो वेडा किंवा दूध पिणारे बाळ आहे, असे म्हणावे लागेल.

“त्याशिवाय, जर देव निर्माता आहे, तर सर्व लोक त्याला आदराने पुजत का नाहीत, त्यांना जेव्हा गरज 
असते तेव्हाच ते त्याच्यापुढे जाऊन विनवणी का करतात?

“आणि लोक एकापेक्षा अनेक देवांना का मानतात? अशा प्रकारे तर्काच्या युक्तिवादावर देवाची 
कल्पना ही चुकीची असल्याचे सिद्ध होते आणि अशा प्रकारचे सर्व विरोधाभास असलेली 
विधाने उघड झाली पाहिजेत. "

लेखक : देविप्रसाद चट्टोपाध्याय
अनुवाद : सचिन वाघमारे

View full details