Akshardhara Book Gallery
Bhartiya Sanvidhan Ek Mayaja (भारतीय संविधान एक मायाजाल)
Bhartiya Sanvidhan Ek Mayaja (भारतीय संविधान एक मायाजाल)
Share
Couldn't load pickup availability
Author: Arun Sarathi
Publisher: Dilipraj Prakashan Pvt Ltd
Pages: 123
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
एक सामान्य नागरिकाच्या दृष्टिकोनातून
भारतीय संविधान एक मायाजाल
कार्यकारी सत्तेचे विधिमंडळातील बहुमतावर अतिरिक्त परावलंबित्व आणि त्यातून निष्पन्न होणारे शासकीय अस्थैर्य हा संसदीय पद्धतीचा उपजत आणि घटनात्मक असमतोल निर्माण करणारा गंभीर दोष होय. तो दूर करणारी तरतूद संविधानात नसेल तर यथाकाल अस्थैर्यामुळे कार्यकारी सत्ता आणि शासकीय यंत्रणा तसेच सतत घ्याव्या लागणाऱ्या निवडणुकांमुळे विधिमंडळे अकार्यक्षम होतात.त्याचा परिणाम न्यायालयीन यंत्रणे वर होऊन तीहि हळूहळू पांगळी होते.
संवैधानिक घटक अशा तऱ्हेने एका बाजूला विकलांग होत असतांनाच,सहमती आणि लोकसेवा या लोकशाहीच्या खऱ्या अंतरंगाऐवजी जबाबदार राज्यपद्धती आणि निवडणूका या लोकशाहीच्या बाह्यांगांवर अतिरिक्त भर दिल्यामुळे भारतीय संविधानात नमूद केलेली उदिष्ट्टे मृगजळाप्रमाणे फसवी ठरत आहेत. भारतीय संविधानाच्या या मायाजालाचा शोध घेणारे पुस्तक.
लेखक: अरुण सारथी
प्रकाशन : दिलीपराज प्रकाशन प्रा.लि.
