Akshardhara Book Gallery
Bhasha (भाषा)
Bhasha (भाषा)
Share
Couldn't load pickup availability
Author: Pankaj Kurulkar
Publisher: Varnamudra Publishers
Pages: 156
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
भाषा
"माझ्या लेखनाला वास्तवाचा भरभक्कम आधार आहे," असे विधान गाब्रिएल गार्सिया मार्केस ह्या श्रेष्ठ कादंबरीकाराने केलेले आहे. अर्थातच हा भरभक्कम आधार घेऊन मार्केसने मॅजिक रिअॅलिझमचे गारूड करून कथात्म लेखनप्रकारावर आपला अमीट ठसा उमटवला. पंकज कुरुलकर यांच्या कथा वाचताना वास्तवाच्या ह्या भरभक्कम आधाराची जाणीव ओळीओळींतून होतेच, परंतु त्या पायावर कुरुलकर आपले जे कथाशिल्प साकार करतात, ते वाचकांना स्तिमित करणारे आणि शेवटापर्यंत खेचत नेणारे असते, ह्याचाही प्रत्यय येतो. बहुप्रसवता हा कदाचित एखाद्या लेखकाच्या बाबतीत चिंतेचा आणि दुर्गुणाचा विषयही ठरू शकला असता, परंतु कुरुलकर इथेही विरुद्ध दिशेने चिंताजनक ठरतात. त्यांच्या आगामी लेखनप्रकल्पांविषयी जाणून घेताना हताशपणे 'आदमी एक और इतने सारे काम' ही लीलाधर जगुड़ींची ओळ अपरिहार्यपणे ओठांवर येते. 'वर्णमुद्रा' कुरुलकरांचे हे तिसरे पुस्तक प्रकाशित करताना अतिशय आनंदी असून, त्यांच्या पुढील लेखनप्रवासास शुभेच्छा देतानाच सक्रिय सहभागाची हमीसुद्धा देत आहे."
लेखक. पंकज कुरुलकर
प्रकाशक वर्णमुद्रा पब्लिशर्स
