Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Bhashayan (भाषायण)

Bhashayan (भाषायण)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Balaji Madan Ingale

Publisher: Golden page Publication

Pages: 112

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

भाषायण

भाषा शिक्षणात माषेचा वापर करता येणे ही सगळ्यांत महत्त्वाची बाब असते. तो वापर जितका विविधांगी असेल, तितकी आपली भाषा समृद्ध होत जाते. तो वापर प्रत्यक्ष जीवनाशी जितका जोडलेला असेल, तितका अर्थपूर्ण होत जातो. हे सहजतेने कसे साध्य करायचे, ते बालाजी मदन इंगळे यांनी त्यांच्या 'भाषायण मुलांच्या प्रगतीचं टॉनिक' या पुस्तकात उलगडून दाखवले आहे. या पुस्तकातील निवेदनाची भाषा मुलांशी सहज गप्पा माराव्यात, अशी सरळ सोपी आहे. एकट्याने, मित्रांच्या मदतीने, वर्गात किंवा शाळेत उपक्रम कसे पार पाडावे, हे मुलांना तर त्यातून समजेलच, पण शिक्षकांनाही तपशीलवार नियोजन करताना ते उपयोगी पडेल. मुलाखत आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या मोठ्या माणसांनाही त्यातील 'टिप्स' उपयोगी पडतील. आपल्या अनुभवातून खास वाक्प्रचार तयार करणे, म्हणी-वाक्प्रचार यांच्यावर आधारित छोट्याशा नाटिका सादर करणे अशा काही अभिनव कल्पनांचे उपक्रम यात आहेत. अनुवाद या महत्त्वाच्या पण शालेय अभ्यासक्रमात अलीकडे थोड्या दुर्लक्षित राहिलेल्या क्षेत्रातील उपक्रमही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मुलांचे भाषिक जीवन समृद्ध बनवण्यासाठी आणि एकूणच शाळेचा 'अभ्यास' चैतन्यमय करण्यासाठी उपक्रमांचा हा खजिना नक्कीच उपयोगी पडेल.

लेखक. बालाजी मदन इंगळे 
प्रकाशक. गोल्डन पेज पब्लिकेशन 

View full details