Akshardhara Book Gallery
Bhramangatha (भ्रमणगाथा)
Bhramangatha (भ्रमणगाथा)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr. Sharad Kulkarni
Publisher: Anubandh Prakashan
Pages: 172
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
भ्रमणगाथा
समर्थ रामदासांनी 'वडिली जे निर्माण केले। ते पाहिले पाहिजे ।।' असे म्हटले आहे. परमेश्वराने निर्माण केलेले हे जग डोळे भरून पाहण्यातच खरा पुरुषार्थ आहे, असे मानून आजन्म भ्रमंती करणारी आणि त्यातच धन्यता मानणारी अनेक थोर माणसे या देशात होऊन गेली. त्यांच्या कुळात शोभून दिसतील असे डॉ. शरद कुलकर्णी यांचे व्यक्तिमत्त्व आहे. भ्रमंती करणाऱ्यांचे दोन वर्ग असतात. आपली भरलेली बॅग इतरांच्या हवाली करणारे आणि सगळ्या जबाबदाऱ्यांतून मुक्त होणारे एका वर्गात मोडतात. दुसरा वर्ग असतो तो इतरांची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन त्यांना भ्रमणानंद देणाऱ्यांचा. डॉ. शरद कुलकर्णी या दुसऱ्या वर्गातले आहेत. सेवानिवृत्तीनंतरच्या तीस वर्षांत ७५ सामूहिक सहलींचे आयोजन करून सहा वर्षांच्या मुलींपासून ते ९२ वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत सर्वांना सोबत घेऊन सहली यशस्वी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. या निमित्ताने आलेले अनुभव त्यांनी या भ्रमणगाथेमध्ये अक्षरबद्ध केले आहेत. डॉ. शरद कुलकर्णी यांची सूक्ष्म निरीक्षणशक्ती, कोणताही अनुभव उत्कटतेने घेण्याची जिंदादिल वृत्ती आणि जे पाहिले, अनुभवले ते मांडण्याची सुरेख अनलंकृत लेखनशैली यामुळे त्यांचे 'भ्रमणगाथा' हे पुस्तक वाचनीय झाले आहे. चोखंदळ वाचक या पुस्तकाचे स्वागतच करतील, याची मला खात्री आहे.
लेखक. डॉ. शरद कुलकर्णी
प्रकाशक. अनुबंध प्रकाशन
